बिबटयाचा घरात घुसून महिलेवर हल्ला, महिला गंभीर जखमी

38

मूल :— तालुक्यातील शिवापूर चक येथे दिनांक 11आॅक्टोबर 2024 रोजी पहाटे 4.00 वाजताच्या सुमारास बिबटयाने घरात घूसून झोपलेल्या महिलेवर हल्ला करून तिला गंभीर जखमी केले.
जखमी महिलेचे नाव वंदना परशूराम निमगडे वय 46 वर्ष असे आहे

शिवापूर चक हे गाव ताडोबा बफर झोन मध्ये येत असून या भागात वाघ अस्सवल वनप्राण्यांचा वावर आहे. हे गाव जंगलाला लागून असल्यामूळे येथील गावकरी नेहमीच दहशतीच्या वातावरणात जगतात. परशूराम निमगडे कुटुंबीय झोपलेले असताना पहाटे 4 च्या सुमारास बिबटयांने घरात घुसून वंदना निमगडे या महिलेवर हल्ला केला.
घराजवळ कुत्रयांचा आरडाओरड सुरू झाल्यामूळे परशूराम व कुटूंबीय झोपेतून जागे झाले. तेव्हा त्यांना पत्नी वंदना वर बिबटाने हल्ला करीत असल्याचे दिसले त्यांनी आरडाओरड करताच बिबटया पळून गेला.
या घटनेची माहीती त्यांनी वनविभाग मूल यांना दिली असता त्यांनी घरी येवून चौकशी करून घटनेचा पंचनामा केला व जखमी महिलेला उपजिल्हा रूग्णालय मूल येथे दाखल केले. घटनेचा पुढील तपास वनपरीक्षेत्र अधिकारी राहूल कारेकर हे करीत आहे.
गावकरी दहशतीत असून वाघ व बिबटयाचा त्वरीत बंदोबस्त करावा अशी मागणी केलेली आहे.