विसर्जनासाठी गेलेले दुगाळा येथील सातपुते नहरात लापता

23

मुल तालुक्यातील दुगाळा जवळील गोशिखुर्द कालव्यातील घटना

मुल तालुक्यातील बेंबाळ पोलिस चौकी अंतर्गत घटना

भेजगाव प्रतिनिधी,

मुल तालुक्यातील चक दुगाळा येथील युवा शेतकरी दिलीप सातपुते वय 42 याचा दुर्गा देवी विसर्जन दरम्यान पाण्यात बुडून लापता झाल्याची घटना आज 13 रोजी रविवारला सकाळी 11.00 वाजताच्या सुमारास घडली आहे. त्यामुळे गावात सर्वत्र हळ हळ होत असून शोककळा पसरली आहे. पोलिस चमू घटना स्थळी दाखल होत शोध कार्य सुरू केले असून पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने बुडणाऱ्या व्यक्तीचा वृत्त लीहिस्तोवर शोध लागलेला नाही.

सर्वत्र गावोगावी ठीक ठिकाणी दुर्गा मातेचे विसर्जन मोठ्या उत्साहात व थाटामाटात चालू आहे. आज रविवारी ता. 13/10 लां सकाळी 11.00 वाजताच्या सुमारास दुगाळा येथील महिला व पुरुष यांनी दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा दुर्गा देवीचे मोठ्या थाटामाटात वाजत गाजत मिरवणूक काढत गावा जवळून वाहत जाणाऱ्या गोशीखुर्द नहरात विसर्जन करण्यासाठी लोक देवीला घेऊन गेले असता सकाळी 11.00 वाजताच्या सुमारास कालव्यातील पाण्याचे प्रमाण न कळल्यामुळे दुगाळा येथील शेतकरी दिलीप सातपुते हे पाण्यासोबत वाहून गेले असल्याची घटना घडली आहे. दिलीप सातपुते हे दुगाला येथील ग्रामपंचायत सदस्य असून गाव व परिसरात सर्वत्र हळहळ होत आहे. बघ्यांची मोठी गर्दी घटना स्थळी झाली असून पोलिस चौकी बेंबाळ कडून सातपुते यांचं शोध सुरू आहे. त्यांच्या पश्चात मुलगी मुलगा पत्नी आई वडील असा बराच आप्त परिवार आहे.
गोशिखुर्द चे नहर लापता सातपुते यांचा शोध घेत असून उपाय म्हणून गोशिखुर्द नाहर काही वेळा करिता बंद करणार असल्याची माहिती आहे.

शेतीचे हंगाम सुरू असून अनेक शेतकऱ्यांचे भात भिक निस्व्यावर तर काहींचे पोट्र्यावर आहे. भात पिकाला पाण्याची मोठी गरज असल्याने नाहराचे पाणी दिवस रात्र चालू राहते. त्यामुळे शेतकरी बांधवांनी व गावा शेजारी छोट्या छोट्या मुलांनी अनुचित घटना घडू नये म्हणून काळजी करणे गर्जेजे आहे.