अखेर प्रतिक्षा संपली! ‘या’ तारखेला होणार महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक

8

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विधानसभा निवडणूक केव्हा जाहीर होणार याची सर्वच राजकीय पक्षांना उत्सुकता लागली होती. अखेर आज विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर होणार आहे. निवडणूक आयोग आज दुपारी ३.३० वाजता पत्रकार परिषद घेणार असून यावेळी महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार असल्याचे निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आलं आहे. निवडणूक आयोगाने निवडणुकीची तारीख जाहीर करताच यावर विविध राजकीय प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात एका टप्प्यात मतदान – राजीव कुमार

महाराष्ट्रात एका टप्प्यात मतदान

२२ ऑक्टोबर रोजी अर्ज भरण्याची तारीख

२९ ऑक्टोबर अर्ज मागे घेण्याची तारीख

३० ऑक्टोबर अर्ज छाणणी

४ नोव्हेंबर अर्ज मागे घेण्याची तारीख

२० नोव्हेंबर रोजी मतदानाची तारीख

२३ नोव्हेंबर रोजी निकाल