भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर, देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार,चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह विदर्भात कुणा-कुणाची वर्णी?

22

विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. अशातच साऱ्यांना उत्सुकता लागून राहिलेल्या उमेदवारांच्या नावाची अखेर आज भारतीय जनता पक्षाने घोषणा केली आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी भाजपने आपली पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि खासदार अशोक चव्हाण यांच्या मुलीला उमेदवारी जाहीर झाली आहे.

पहिल्या यादीत एकूण 99 जागांसाठी उमेदवारांची नावे जाहीर

विधानसभा निवडणुकांसाठी (VidhanSabha Election) भाजपकडून (BJP) पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये 99 उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली असून 13 महिलांना भाजपकडून संधी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना नागपूर जिल्ह्याच्या कामठी कामठी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून महायुतीमध्ये 288 जागांच्या वाटपावर चर्चा चालू आहे. जवळपास सर्वच जागांवरील चर्चा निकाली लागली आहे. असे असताना आता भाजपाने एकूण 99 जागांसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. तुलनेने सुरक्षित असणाऱ्या जागांचा भाजपाने आपल्या पहिल्या यादीत समावेश केला आहे. या यादीत भाजप महाराष्ट्राचे सर्वोच्च नेते देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा समावेश आहे.

पहिल्या यादीत विदर्भात विदर्भात कुणा-कुणाची वर्णी?

  • कामठी -चंद्रशेखर बावनकुळे
  • नागपूर पश्चिम – देवेंद्र फडणवीस
  • नागपूर दक्षिण – मोहन मते
  • नागपूर पूर्व – कृष्ण खोपडे
  • चिखली -श्वेता महाले
  • खामगाव – आकाश फुंडकर
  • अकोला पूर्व – रणधीर सावरकर
  • धामगाव रेल्वे – प्रताप अडसद
  • अचलपूर – प्रवीण तायडे
  • हिंगणघाट – समीर कुणावार
  • वर्धा – पंकज भोयर
  • हिंगना – समीर मेघे
  • तिरोरा – विजय रहांगडाले
  • गोंदिया – विनोद अग्रवाल
  • बल्लारपूर – सुधीर मुनगंटीवार
  • चिमूर – बंटी भांगडिया
  • वाणी – संजीवरेड्डी बोडकुरवार
  • रालेगाव – अशोक उडके
  • यवतमाळ – मदन येरवर

महाराष्ट्रातील उर्वरित उमेदवार

  • शहादा – राजेश पाडवी
  • नंदूरबार- विजयकुमार गावीत
  • धुळे शहर -अनुप अग्रवाल
  • सिंदखेडा – जयकुमार रावल
  • शिरपूर – काशीराम पावरा
  • रावेर – अमोल जावले
  • भुसावळ – संजय सावकारे
  • जळगाव शहर – सुरेश भोळे
  • चाळीसगाव – मंगेश चव्हाण
  • जामनेर -गिरीश महाजन
  • जळगाव (जामोद) – संजय कुटे
  • देवली – राजेश बकाने
  • अमगांव – संजय पुरम
  • आर्मोली – कृष्णा गजबे
  • किनवट – भीमराव केरम
  • भोकर – क्षीजया चव्हाण
  • नायगाव – राजेश पवार
  • मुखेड – तुषार राठोड
  • हिंगोली – तानाजी मुटकुले
  • जिंतूर – मेघना बोर्डीकर
  • परतूर – बबनराव लोणीकर
  • बदनापूर -नारायण कुचे
  • भोकरदन -संतोष दानवे
  • फुलंब्री – अनुराधा चव्हाण
  • औरंगाबाद पूर्व – अतुल सावे
  • गंगापूर – प्रशांत बंब
  • बगलान – दिलीप बोरसे
  • चंदवड – राहुल अहेर
  • नाशिक पुर्व – राहुल ढिकाले
  • नाशिक पश्चिम – सीमाताई हिरे
  • नालासोपारा – राजन नाईक
  • भिवंडी पश्चिम – महेश चौघुले
  • मुरबाड – किसन कथोरे
  • कल्याम पूर्व – सुलभा गायकवाड
  • डोंबिवली – रवींद्र चव्हाण
  • ठाणे – संजय केळकर
  • ऐरोली – गणेश नाईक
  • बेलापूर – मंदा म्हात्रे
  • दहिसर – मनीषा चौधरी
  • मुलुंड – मिहिर कोटेचा
  • कांदिवली पूर्व – अतुल भातखलकर
  • चारकोप – योगेश सागर
  • मालाड पश्चिम – विनोद शेलार
  • गोरेगाव – विद्या ठाकूर
  • अंधेरी पश्चिम – अमित साटम
  • विले पार्ले – पराग अलवणी
  • घाटकोपर पश्चिम – राम कदम
  • वांद्रे पश्चिम – आशिष शेलार
  • सायन कोलीवाडा- तमिल सेल्वन
  • वडाळा – कालिदास कोळंबकर
  • मलबार हिल – मंगलप्रभात लोढा
  • कुलाबा – राहुल नार्वेकर
  • पनवेल – प्रशांत ठाकूर
  • उरन – महेश बाल्दी
  • दौंड- राहुल कुल
  • चिंचवड – शंकर जगताप
  • भोसरी -महेश लांडगे
  • शिवाजीनगर – सिद्धार्थ शिरोले
  • कोथरुड – चंद्रकांत पाटील
  • पर्वती – माधुरी मिसाळ
  • शिर्डी – राधाकृष्ण विखे पाटील
  • शेवगाव – मोनिका राजले
  • राहुरी शिवाजीराव कर्डिले
  • श्रीगोंदा – प्रतिभा पाचपुते
  • कर्जत जामखेड – राम शिंदे
  • केज – नमिता मुंदडा
  • निलंगा- संभाजी पाटील निलंगेकर
  • औसा – अभिमन्यू पवार
  • तुळजापूर – राणा जगजितसिंह पाटील
  • सोलापूर शहर उत्तर – विजयकुमार देशमुख
  • अक्कलकोट – सचिन कल्याणशेट्टी
  • सोलापूर दक्षिण – सुभाष देशमुख
  • मान -जयकुमार गोरे
  • कराड दक्षिण – अतुल भोसले
  • सातारा – शिवेंद्रराजे भोसले
  • कणकवली – नितेश राणे
  • कोल्हापूर दक्षिण – अमल महाडिक
  • इचलकरंजी – राहुल आवाडे
  • मिरज – सुरेश खाडे
  • सांगली – सुधीर गाडगीळ