मूल@ क्रीडा संकुलात आंतर महाविद्यालयीन वेटलिफ्टिंग, पॉवरलिफ्टिंग आणि बॉडीबिल्डिंग स्पर्धा

21

शिक्षण प्रसारक मंडळ मूल संचालित आणि गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली संलग्न कर्मवीर महाविद्यालय, मूल यांच्या वतीने तालुका क्रीडा संकुलात आंतर महाविद्यालयीन वेटलिफ्टिंग, पॉवरलिफ्टिंग आणि बॉडीबिल्डिंग स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या स्पर्धेत विविध महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांनी आपली क्षमता दाखवत सहभाग नोंदवला. या क्रीडा स्पर्धांचे अध्यक्षपद माननीय वैरागडे मॅडम यांनी भूषवले, तर प्रमुख पाहुण्या म्हणून आयोजक महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. अनिता वाळके मॅडम उपस्थित होत्या. याशिवाय शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख डॉ. अतुल पारखी आणि इतर मान्यवर देखील कार्यक्रमात सहभागी झाले.

 या स्पर्धेच्या निमित्ताने महाविद्यालयातील क्रीडा गुणवंत विद्यार्थी कु.श्रुती चंद्रकांत लोणबले, करण सुरेश कोसरे, आणि आकाश प्रवीण चौधरी यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साह संचारला आणि त्यांच्या कामगिरीबद्दल विशेष कौतुक करण्यात आले. या स्पर्धा विविध वजनी गटांमध्ये घेण्यात आल्या, ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या शारीरिक क्षमतेचा कस लावला. स्पर्धेत विजय मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

मान.प्रभाकरजी भोयर आणि प्रा. अनिल शेलेकर यांच्या हस्ते विजेत्यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी विविध वजनी गटांमध्ये झालेल्या स्पर्धांमध्ये विजेते विद्यार्थी विशेष कौतुकास पात्र ठरले. या स्पर्धेने विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा कौशल्य वृद्धिंगत करण्यास मदत केली तसेच त्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली क्षमता दाखवण्याची संधी उपलब्ध करून दिली.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात प्रा. लेनगुरे आणि प्रा. दहिवले यांचे मोलाचे योगदान होते. या क्रीडा स्पर्धेमध्ये खेळाडूंना आवश्यक त्या सुविधा पुरवून त्यांना उत्तम प्रदर्शन करण्यासाठी पोषक वातावरण उपलब्ध करून दिले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सागर मासिरकर यांनी कौशल्यपूर्ण पद्धतीने केले, तर आभार प्रदर्शन प्रा. नीरज चन्ने यांनी केले.