कास्ट्राईब कर्मचारी परीवारतर्फ बुद्ध गिरी येथे ग्रंथभेट,भोजनदान व भिमगिताचा कार्यक्रम

44

कास्ट्राईब कर्मचारी परीवार मुल सावली यांच्या विद्यमाने विसाव्या बुद्धगिरी वर्धापन दिनानिमीत्ताने बुद्ध गिरी मुल येथे वाचनालयास ग्रंथभेट, भोजनदान व चलो बुद्ध की और भिमगिताचा कार्यक्रम घेण्यातआला.
कार्यक्रमाचे उद्घाटन कास्ट्राईब पशुसंवर्धन संघटनेचे राज्य उपाध्यक्ष डॉ.बंडू आकनुरवार यांनी केले.अध्यक्षस्थानी कास्ट्राईब कल्याण महासंघाचे जिल्ह्यध्यक्ष अरूण खराते होते.प्रमुख अतिथी गटशिक्षणाधिकारी सौ वर्षा पिपरे,भागशिक्षणाधिकारी सौ गुज्जनवार,कास्ट्राईब कल्याण महासंघ जिल्ह्यमहासचिव जगदिप दुधे,प्यारेलाल गेडाम, संजय पाझारे,रत्नमाला गेडाम, संजीवनी खोब्रागडे,विजय बावणे,भास्कर रामटेके,संदेश मानकर,चंद्रशेखर खोब्रागडे,सुनिल निमगडे,वामन वाघमारे,संतोष सिडामहोते.सर्वप्रथम गौतम बुद्ध, डॉ.बाबासाहेब आंबेडकर व इतर प्रतिमेची दीपप्रज्वलन करून व फित कापून उद्घाटन करण्यात आले.यावेळी पतसंस्थेत संचालक निवडुन आल्याबद्दल विजय बावणे यांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले.जयभिम वाचनालय सावलीला ग्रंथभेट देण्यात आले.चलो बुद्ध की और भिमगिताचा कार्यक्रम व हजारो बौध्द उपासक,उपासीका यांना भोजनदान देण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनिल निमगडे तालुका महासचिव,संचालन संतोष सिडाम महासचिव आभार जयदीप दुधे यांनी केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी निवृत कविराज मानकर व आकाश कुकुडकर,आतीश उराडे,सचिन रामटेके,बाबाराव मेश्राम, अविनाश घोनमोडे, सौ विद्या कोसे,रतिशा रामटेके व सदस्यांनी परीश्रम घेतले. कार्यक्रमाला मुल सावली तालुक्यातील कास्ट्राईब कर्मचारी परिवारातील शेकडो सदस्य उपस्थित होते.