चंद्रपूर : महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेमार्फत १० नोव्हेंबर २०२४ रोजी शिक्षक पात्रता परीक्षा घेण्यात येणार
असून चंद्रपूर जिल्ह्यात ही परीक्षा एकूण १७ केंद्रावर दोन सत्रामध्ये होणार आहे. जिल्ह्यातील ७८९० उमेदवार ही परीक्षा देणार आहेत. शिक्षक पात्रता परीक्षा पेपर- १ करीता २९१४ उमेदवार व पेपर- २ करीता ४८९६ उमेदवार परीक्षा देणार असून परीक्षेची सकाळी १०.३०
ते दुपारी १ वाजेपर्यंत व दुपारी २.३० ते सायं. ५ वाजेपर्यंत आहे. परीक्षार्थ्यांना सकाळच्या पेपरला १०.१० वाजेपर्यंत पर्यंत तर दुपारच्या पेपरला २.१० वाजेपर्यंत परीक्षा दालनात येण्याची परवानगी राहील. सदर परीक्षेदरम्यान सी. सी. टी. व्ही. कॅमेरे राहणार आहे. कोणत्याही प्रकारचे गैरप्रकार झाल्यास संबंधितावर कार्यवाही करण्यात येईल. तसेच परीक्षेकरीता मुळ ओळखपत्र असणे आवश्यक आहे.