३१ डिसेंबरपर्यंत करता येईल रेशनसाठी ई-केवायसी

22

चंद्रपूर : प्रत्येक शिधापत्रिकाधारकाला ‘ई-केवायसी’ करणे बंधनकारक करण्यात आले आहे. विशेष म्हणजे शिधापत्रिकेत नाव असलेल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला ई- केवायसी पडताळणी प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. याची अंतिम मुदत ३१ ऑक्टोबर होती आता केंद्र शासनाकडून प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली आहे. ३१ डिसेंबरपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करावी.
प्रत्येक लाभार्थ्याला ई-केवायसी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. बँकेचे खाते असो किया शासकीय योजनेचा लाभ घ्यायचा असो, प्रत्येक ठिकाणी ई-केवायसी बंधनकारक करण्यात आली आहे. त्यातच आता सर्वसामान्य नागरिकांकडे रेशनकार्ड साठीही ई-केवायसी बंधनकारक करण्यात आली आहे.
बोगस लाभार्थी शोधून काढण्याच्या उद्देशाने ई-केवायसी महत्त्वाची ठरत आहे. मात्र, पात्र लाभार्थी धान्यापासून वंचित राहू नये, यासाठी शासनाकडून सातत्याने ई-केवायसीसाठी मुदतवाढ दिली जात आहे. आता रेशनकार्ड व लाभार्थ्यांच्या ई-केवायसीसाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे वेळेत ई-केवायसी करावे, असे आवाहन केले आहे.
फोर-जी ई-पॉस मशीनद्वारे ई-केवायसी रेशनकार्डची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नसेल, तर परिसरातील स्वस्त धान्य दुकानातील फोर-जी ई-पॉस मशीनद्वारे ई-केवायसी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. लाभार्थ्यांचा आधारकार्ड क्रमांक टाकल्यानंतर लाभार्थ्यांचे बोटाचे ठसे व डोळे स्कॅन करून ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण केली जाते.
यापूर्वी दोनवेळा मुदतवाढ पांढया व पिवळ्या
रेशनकार्डधारकांसाठी ई-केवायसी करण्याची मार्गदर्शक तत्त्वे लागू केली होती. त्यात सर्व रेशनकार्डधारकांनी ई-केवायसी करणे अनिवार्य होते. त्यासाठी आता शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०२४ करण्यात आली आहे. आतापर्यंत दोनवेळा ई-केवासयी प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली आहे.