८५ वर्षांवरील ज्येष्ठ, दिव्यांग मतदारांचे गृहमतदान
विधानसभा निवडणूकीसाठी गृहमतदान निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा आणि मतदानापासून कोणीही वंचित राहू नये यासाठी ‘भारत निवडणूक आयोग’ने घरुनच मतदान करण्यासाठी सोय उपलब्ध करुन दिली आहे. त्याअंतर्गत बल्लारपूर विधानसभा मतदारसंघामध्ये गृहमतदानाला सुरुवात झाली आहे.
निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी सर्व मतदारांना संधी मिळावी, विशेषत: ८५ वर्षांपेक्षा जास्त वय असलेले वृद्ध आणि दिव्यांग असलेल्या मतदारांसाठी ७२ बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात दि ०९/११/२०२४ ते ११/११/२०२४ घरून मतदान (होम व्होटिंग)
त्यानुसार बल्लारपूर मतदारसंघात ८५ वर्षावरील नागरिकांनी तर
दिव्यांग मतदारांनी नागरिकांनी गृहमतदान करणार आहे .
विशेष म्हणजे १०० वर्षांच्या सर्वात ज्येष्ठ मतदाराने आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे.
बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात (पुरुष मतदार – 158071, स्त्री मतदार – 153017, एकूण – 311094
दरम्यान, गृहमतदान येत्या 11 नोंव्हेंबर २०२४ पर्यंत सुरु राहणार आहे. त्यासाठी बल्लारपूर मतदार संघात वेगवेगळया दिशेने पथक रवाना झालेले आहेत. आणि आजपासून मतदान ची प्रक्रिया सुरू झालेली आहे.
ज्या मतदारांनी ‘निवडणूक आयोग मार्फत १२ अ नमुना अर्ज भरुन दिले आहेत, त्या मतदारांचे गृहमतदान करुन घेतले जाणार असल्याचे ’07-बल्लारपूर विधानसभा मतदार संघ’च्या निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अजय चरडे – मूल यांनी सांगितले.