महाविकास आघाडीवर तेली समाज नाराज?

17

2004 मध्ये कॉंग्रेसने तेली समाजाचे नेते, माजी आमदार देवराव भांडेकर यांना उमेदवारी दिलेली असतांनाही, कॉंग्रेसचे नेते संतोष रावत यांनी भांडेकर यांना साथ न देता, विरोधी पक्षाचे उमेदवार श्रीमती शोभाताई फडणवीस यांचेसाठी केलेले काम आता रावत यांचे अडचणीत वाढ करीत आहे. त्यावेळी रावत हे पक्षासोबत राहीले असते तर देवराव भांडेकर यांना अल्पमतानी पराभव पत्करावा लागला नसता. याचे शल्य या समाजात आहे. यामुळे तेली समाज आता त्या निवडणूकीचा बदला घेणार काय? अशी चर्चा आहे. तेली समाजाची नाराजी कॉंग्रेसचे उमेदवार संतोष रावत यांना भोवणार असल्याची चर्चा आहे. माजी आमदार देवराव भांडेकर यांचे पुत्र महेश भांडेकर हे अपक्ष उमेदवार अभिलाषा गावतुरे यांचे प्रचारात खुले फिरत असल्याचे दिसत आहे. यावरूनच त्यांची काँग्रेस वरील नाराजी स्पष्ट होते.
2019 मध्ये तेली समाजाचे डॉ. विश्वास झाडे यांना काँग्रेसने उमेदवारी दिली त्यावेळीही रावत व रावत समर्थकांनी विश्वास झाडेंना मनातून साथ दिली नाही. आपला फोकस बाजूच्या ब्रह्मपुरी निर्वाचन क्षेत्रातील विजय वडेट्टीवार यांचे प्रचारासाठी लावला होता, याचीही चर्चा आता या निवडणुकीत होत असून याचा फटका रावत यांना बसण्याची शक्यता आहे.
महाविकास आघाडीतून कॉंग्रेसने बल्हारपूर क्षेत्रातून संतोष रावत यांना उमेदवारी जाहीर केली. रावत यांनी प्रचारही सुरू केला, मात्र त्यांचे उमेदवारीवर तेली समाज नाराज असल्यांने, याचा फटका रावत यांना बसण्याची शक्यता आहे. रावत यांची उमेदवारी अर्ज दाखल करतांना किंवा रॅलीत एकही तेली समाजाचा वरीष्ठ नेता त्यांचे सोबत नव्हता, हे उल्लेखनीय.
निवडणूकीची रणधुमाळी सुरू आहे. मुनगंटीवार विरूध्द रावत, अपक्ष उमेदवार अभिलाषा गावतुरे अशी तिरंगी लढत आहे. या लढतीत रावत हे पहिल्यांदाच विधानसभेची निवडणूक लढवित आहे. रावत पहिल्यांदाच रिंगणात असले तरी, ते मागील 40 वर्षापासून विधानसभेच्या प्रचार यंत्रणेत सक्रिय भूमिका घेतात. आधी भाजपाच्या श्रीमती शोभाताई फडणवीस यांचे प्रचाराची धुरा ते सांभाळायचे. नंतर त्यांचे शोभाताईसोबत बिनसल्यानंतर, कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांनी 2004 मध्ये कॉंग्रेसची उमेदवारी मागीतली. ती त्यांना मिळाली नाही. ही जागा तेली समाजाचे, माजी आमदार देवराव भांडेकर यांना मिळाली. त्यांनी शोभाताई फडणवीस यांना चांगली लढत दिली. मात्र त्यावेळी संतोष रावत हे पक्षासोबत देवराव भांडेकर यांचे बाजूने राहण्याऐवजी आतुन शोभाताई फडणवीस यांचेकरीता फिल्डींग लावल्यांने केवळ साडेचार हजाराचे अल्प मताचे फरकाने श्री. भांडेकर यांचा पराभव झाला होता. 2004 मध्ये श्रीमती फडणवीस यांचे विरोधात सावली निर्वाचन क्षेत्रात प्रचंड नाराजी होती. त्यांना मतेही कमी मिळाली, मात्र रावत यांनी त्यावेळी उमेदवारी नाकारल्यांने, पक्षासोबत न राहता, श्रीमती फडणवीस यांचा प्रचार केल्यांनेच त्यांचा निसटता विजय झाला होता. रावत यांनी भांडेकर यांचेसोबत केलेला त्यावेळचे राजकारण आता त्यांचे उमेदवारीने ताजा झाला असून, कॉंग्रेसमध्ये राहून भांडेकर यांचा पराभव करण्यासाठी भाजपाशी संधान साधणार्यांना आणि समाजाचे मोठे नुकसान करणारे रावत यांना या निवडणूकीत धडा शिकविण्याचा तेली समाजात मंथन सुरू झाले आहे.
दुसरीकडे निवडणूक जाहीर होण्याच्या एक आठवडा पूर्वी तेली समाजाची सभागृहाची निमित्ताने झालेल्या कार्यक्रमात सुधीर मुनगंटीवार यांच्या वक्तृत्वाने आणि केलेल्या घोषणेने तेली समाजात त्यांचे त्यांचे बद्दल आत्मसन्मान भावना आहे. या समाजाचा संतोष रावत यांच्यावरील रोष सुधीर मुनगंटीवार यांचे मते वाढवीत आहेत.