राजकारणात अनेक येतात.. जातात कारण हें क्षेत्र कुणाची मक्तेदारी नाहीच मुळी.. मात्र चंद्रपूर जिल्ह्यात विधानसभेत निवडून येण्याची सप्तमी पूर्ण करणारे किमयागार म्हणून श्री. सुधीरभाऊंचे नांव राजकारणात सुवर्णमुद्रित अंकित होईल ह्यात मला शन्का वाटत नाहीं.
निवडणुकीत आजकाल कोण जिंकून येईल हें मनी, माफिया, मसल व मॅन पॉवर आणि मीडिया यावर अवलंबून असले तरी यात अजून एक फॅक्टर जोडला जातो तो म्हणजे जातं आणि धर्म आणि खोट्या वावड्या ज्याचा लोकसभा निवडणुकीत आम्ही सर्वांनी अनुभव घेतला आहेच. सोशल मीडिया एखादी बातमी, एखादा प्रसंग वा त्या वक्त्याचे बोलण्याचे गांभीर्य अगदीच चिल्लर करुन वातावरण बिघडवितात आजही भाऊ च्या ऑफिस ला येणाऱ्या भगिनीला जेवढा आदर, सन्मान मिळतो तेवढा मी इतरत्र बघितलेला नाहीं.मात्र लोकसभेत एखादी क्लिप मुनगंटीवार साहेबाना स्त्रियांचा नायका ऐवजी खलनायक ठरवून गेलीं. व भाऊलाच नव्हे सर्वाना वेदनादायी ठरली. आज भाऊ खासदार असते तर केंद्रात मंत्री असते व विकासाला वेग आला असता.
मात्र आमचीं चूक झाली संविधान खतरेमे आरक्षण संपणार विशिष्ट्य धर्माच्या लोकांना हाकलणार हया भ्रमात आम्ही गेलो व एका चांगल्या उमेदवाराला आंम्ही न्याय दिला नाहीं याची चूटपुट खन्त आजही अनेक व्यक्त करतात तेव्हा भाऊंचे व्यक्तिमत्व व मोठेपण कळते
आज चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांनी भगिनींनी समजून घ्यायची गरज आहें की गेल्या मुंनगंटी वार जी ह्यांना जे जे मंत्रालय भेटले त्या त्या मंत्रालयाचा लाभ चंद्रपूर मायभूमी साठी केला हें कुणी विसरेल..येत्या 20 नोव्हेंबर ला सद सद विवेक बुद्धी जागृत ठेवून मतदार निर्णय घेतीलच येणारे भविष्यात हा जिल्हा आध्यात्मिक, खनीज संपत्ती, सामाजिक क्षेत्र आनंदवन साठी ओळखला जातो तो विकासाचे मॉडेल म्हणूनही ओळखला जावा करिता श्री. सुधीरभाऊ सारख्या उच्चशिक्षित, संसधीय आयुधाची भरमार आणि आणि अभ्यासू व्यक्तिमत्व आणि गावाखेड्यातील सामान्य कार्यकर्त्यांच्या गळ्यातील तावीज असलेल्या योग्य उमेदवाराला विक्रमी मतांनी निवडून देईलच.व सातव्यान्दा विजयश्री माळ घालेल. भाऊचा विजय म्हणजे सर्वसामान्यांचा विजय, विकासाचा विजय ठरेल ह्यात शन्का नाहीं.
विजयी भव.!
श्रीराम पा न्हेरकर
सामाजिक कार्यकर्ता चंद्रपूर