नवनियुक्त शिक्षकांचे सात दिवसीय जिल्हास्तरीय प्रशिक्षण नवभारत कन्या विद्यालय मूल येथे

19

मूल येथे नवनियुक्त शिक्षकांचे प्रशिक्षण
मूल नवनियुक्त शिक्षकांचे सात दिवसीय जिल्हास्तरीय प्रशिक्षण नवभारत कन्या विद्यालय मूल येथे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था चंद्रपूरचे प्राचार्य राजकुमार हिवारे व पंचायत समिती मूलच्या गटशिक्षणाधिकारी वर्षा पिपरे यांच्या मार्गदर्शनात पार पडले.
सदर प्रशिक्षण ४ नोव्हेंबर ते ११ नोव्हेंबर या कालावधीत ५० तासांचे प्रशिक्षण आयोजन करण्यात आले. यावेळी नवनियुक्त शिक्षकांना विद्यार्थ्यांना विविध कला-कौशल्य वापरून व विविध शैक्षणिक साहित्यांचा वापर करून अध्यापन पद्धतीचा अवलंब करण्याचे मार्गदर्शन या प्रशिक्षणादरम्यान देण्यात आले. या प्रशिक्षणादरम्यान जिल्हा परिषद
चंद्रपूरच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी अश्विनी सोनवाणे, रवी तामगाळगे, अमोल बल्लावार आदींनी प्रशिक्षण वर्गास भेट देऊन मार्गदर्शन केले. या प्रशिक्षणात मूल, सिंदेवाही, सावली या
तालुक्यांतील एकूण ६० नवनियुक्त
शिक्षकांना हे प्रशिक्षण देण्यासाठी
समन्वयक आनंद गोंगले, सचिन पुल्लावार, बबिता चहांदे, रेवण मोहुर्ले व गणेश आसेकर यांनी मोलाची कामगिरी बजावली. प्रशिक्षणाचा समारोपीय कार्यक्रम शिक्षण विस्तार अधिकारी जयश्री गुज्जनवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी वासुदेव आत्राम, केंद्रप्रमुख प्रमोद कोरडे आदी उपस्थित होते. समारोपीय कार्यक्रमाचे संचालन विनायक कांडारकर यांनी केले.