पिंपरी दीक्षित@जननायक बिरसा मुंडा यांची जयंती उत्साहात साजरी

13

मुल तालुक्यातील पिंपरी दीक्षित येते जननायक बिरसा मुंडा यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

त्यावेळी कार्यक्रमाला गावचे प्रतिष्ठित नागरिक लहू सिडाम, समाज अध्यक्ष माणिक मडावी, संजय मडावी, विनोद मडावी, दशरथ मडावी,  योगेश व गावातील आदी  प्रतिष्ठित नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.

मान्यवरांनी जननायक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन व माळ अर्पण करून जान नायक बिरसा मुंडा यांच्या जीवनावर प्रकाश टाकत त्याच्या कर्यांची माहिती दिली. तसेच कार्यक्रमात विविध आदिवासी खेळ व  आदिवासी नुर्त्य सुद्धा प्रस्तुत करण्यात आले.  त्यानंतर गावातून गोंडी गाणे म्हणत बिरसा मुंडा की जय , जय सेवा, आदी नारेबाजी करीत ढोल तीलबुळी सैनिपोंगाळा वाद्य वाजवत अनेक आदिवासी समाज बांधवांनी मोठ्या संख्येनी प्रभात फेरी काढली. त्यावेळी गावातील इतर समाज बांधव सुद्धा उपस्थित होते.