सुधीरभाऊंमुळे तडाली पोहोचले जगाच्या नकाशावर…

6

विदर्भाची शान – तडालीचे सागवान
तडाली बनणार जगाचं नंबर १ फर्निचर हब
सुधीरभाऊंमुळे तडाली पोहोचले जगाच्या नकाशावर…

बल्लारपूर – सागवानी लाकूड म्हणजे फर्निचरमधलं संगमरवरच! चंद्रपुरातलं तडाली हे छोटंसं गाव आता जगाच्या नकाशावर पोहोचलंय ते त्याच्या अमूल्य, मजबूत, टिकाऊ सागवानी लाकडामुळे! बल्लारपूर मतदारसंघाच्या विकासाच्या वाटेवर या छोट्याशा गावानेही विक्रम नोंदवलाय आणि तेजोमय भविष्याकडे वाटचालही सुरू केली आहे, ती सुधीरभाऊंच्या व्हिजनमुळे!

तडाली बनणार फर्निचर निर्यातीचे केंद्र
तडालीमध्ये तब्बल ४० हजार चौरस मीटर जागेत फर्निचर बनवण्यासाठी जागतिक दर्जाच्या सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ज्यामुळे इथले फर्निचर जगभरात निर्यात करता येईल. त्यासाठी पहिल्या टप्प्यात ५० कोटी आणि दुसऱ्या टप्प्याट २५ कोटी रुपयांचे नियोजन करण्यात आले आहे. यातून २०० कामगारांना कायमस्वरुपी रोजगार मिळणार आहे. या प्रकल्पासाठी सुधीर मुनगंटीवारांच्या मार्गदर्शनाखाली काम सुरू असून दिल्लीस्थित सल्लागाराची नियुक्तीही करण्यात आली आहे.

राम मंदिरबांधणीचे पुण्य!
तडालीचे लाकूड अयोध्येतील राम मंदिराच्या बांधकामात वापरले गेले आहे. एवढेच नव्हे तर, पंतप्रधान कार्यालयातील खुर्च्या व इतर फर्निचरही तडालीच्याच सागवानी लाकडापासून बनवले गेले आहे. त्यामुळे, पंतप्रधान नरेंद्र मोदींसह त्यांच्या कार्यालयातील सर्वजण तडालीचे फर्निचर वापरत असल्याचे आपण अभिमानाने सांगू शकतो. भारतीय रेल्वेच्या ट्रॅकमधील स्लीपरसुद्धा इथल्याच लाकडाचे आहेत.

तडाली म्हणजे सागवानी लाकडांचं माहेरघर…
सुधीरभाऊ मुनगंटीवारांच्या दूरदृष्टीमुळे तडालीसह संपूर्ण चंद्रपूर जिल्हा विकासाच्या महामार्गावर जात आहे.राज्यातील वनवैभव कमी होऊ नये म्हणून नव्या वृक्षारोपणाचाही धडाका सुधीरभाऊंनी लावलाय. त्यामुळे, येत्या काळात जिल्ह्यात जगाचं फर्निचर हब बनवायचं असेल तर सुधीरभाऊंना पर्याय नाही, असे इथल्या स्थानिकांचे मनोगत आहे