महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने मतदान जनजागृतीसाठी मुल तालुका प्रशासनातर्फे स्वीप अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करून लोकशाही प्रक्रियेत आपला सहभाग वाढवावा, या उद्देशाने तालुका प्रशासनाच्या वतीने आज (दि. 18) विद्यार्थ्यांच्या मतदार जनजागृतीचा संदेश दिला.
उपविभागीय तथा तालुका निवडणूक अधिकारी कार्यालय, मूल द्वारा विधानसभा निवडणूक – 2024 स्वीप कार्यक्रमाअंतर्गत मतदार जनजागृती रॅलीचे आयोजन शहरातील नवभारत विद्यालय कन्या तसेच नवभारत विद्यालय मूल पासून तहसील कार्यलय ,पंचायत समिती मूल येथून गांधी चैकात तसेच यावेळी मूल तालुक्यातील तहसीलदार मुदुला मोरे तसेच संवर्ग विकास अधिकारी राठोड व नगरपरीषद मुख्याधिकारी मूल
मूल उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अजय चरडे, यांच्या उपस्थितीत विद्यार्थी, शिक्षक यांनी जवळपास मतदान जागृतीसाठी रॅली काढण्यात आली.
यावेळी तहसिलदार मृदुला मोरे यांनी मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी आपण सर्वांनी जनजागृती करावी, असे आवाहन केले. सोबतच 20 नोव्हेंबर मतदानाच्या दिवशी सर्व नागरीकांनी मतदान करावे.
या नवभारत कन्या विद्यालय तसेच नवभारत विद्यालय,कर्मविर महाविद्यालय शाळांचे विद्यार्थी सहभागी झाली होते.
शिक्षक वृंद तसेच नागरीक,महिला,शिक्षीका ,विविध विभागातील कर्मचारी वृंद,महिला कर्मचारी यांच्यासह मोठ्या संख्येने शालेय विद्यार्थी उपस्थित होते.