मुल चा आठवडी बाजार आज मंगळवार ला भरणार महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २०२४ ही बुधवार दिनांक २०/११/२०२४ रोजी असल्यामुळे आणि लोकशाहीच्या या पर्वात सगळ्यांना सहभागी होऊन आपला मतदानाचा हक्क बजावता यावा आणि त्यापासून कुणीही वंचित राहू नये म्हणून जिल्हा प्रशासनाने बुधवार दिनांक २०/११/२०२४ व शनिवार दिनांक २३/११/२०२४रोजी ज्या गावांमध्ये आठवडी बाजार भरतो तो बाजार एक दिवस आधी किंवा एक दिवस नंतर घेण्याची सुचना स्थानिक प्रशासनाला दिली असून त्यानुषंगाने मूल नगरातील आठवडी बाजार बुधवार ऐवजी मंगळवार दिनांक १९/११/२०२४ रोजी घेण्यासाठी सर्व संबंधितांना कळविले असून त्या सुचनेनुसार मंगळवार दिनांक १९/११/२०२४रोजी मूलचा आठवडी बाजार भरणार आहे, ह्याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी, अशी विनंती संदीप दोडे मुख्याधिकारी नगर परिषद मूल यांनी केली आहे.