72—बल्लारपूर विधानसभा सायंकाळी 5वाजेपर्यंत किती मतदान?

64

 

72 – बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात 98 हजार 179 पुरुष मतदार, 99 हजार 989 स्त्री मतदार व 3 इतर मतदार अशा एकूण 1 लक्ष 98 हजार 171 मतदारांनी (63.44 टक्के) मतदान केले.महाराष्ट्रात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४चं मतदान आज सकाळी ७ वाजेपासून सुरू झालं आहे. 5 वाजेपर्यंत सरासरी 63.44  टक्के मतदान यंदाच्या निवडणुकीत नागरिकांमध्ये उत्साही प्रतिसाद पाहायला मिळत असून, विविध गावामध्ये मतदानाची टक्केवारी वेगवेगळ्या प्रमाणात आहे.

मतदानाला चांगला प्रतिसाद

संपूर्ण मतदानाची टक्केवारी वेगवेगळी असली तरीही, मतदान करणाऱ्यांची संख्या वयोमानानुसार, लिंगानुसार आणि स्थानिक भागानुसार वेगवेगळी आहे. तर, दिवसाअखेरीपर्यंत मतदानाचं प्रमाण वाढेल असा अंदाज देखील वर्तवण्यात येत आहे.

प्रशासनाच्या माहितीनुसार, मतदानाच्या वेळी काही ठिकाणी रांगा लागलेल्या दिसल्या. तर, सगळीकडेच चांगला प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. त्याचप्रमाणे काही भागांत सुरक्षेच्या दृष्टीने विशेष तयारी देखील करण्यात आलेली आहे. विधानसभा निवडणुकीत मतदान वाढवण्यासाठी लोकांमध्ये जागरूकता निर्माण केली गेली आहे. निवडणुकीची टक्केवारी अधिक होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

आज म्हणजेच २० नोव्हेंबर रोजी बल्लारपूर विधानसभा मतदारसंघांसाठी सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाची प्रक्रिया सुरू झाली आहे. हे मतदान एकाच टप्प्यात पार पडत आहे. बल्लारपूर विधानसभा जागांसाठी एकूण 20 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि आज त्यांचं भवितव्य मतपेटीत बंद होईल. मतदान प्रक्रिया ६ वाजेपर्यंत चालू राहील. निवडणुकीचे निकाल २३ नोव्हेंबर रोजी जाहीर होणार आहेत, कोण बाजी मारणार हे स्पष्ट होईल.