फिस्कुटी आणि गडीसुर्ला रस्त्याच्या बाजुच्या शेतात… आढळला 12 फूट लांबीचा अजगर

4

फिस्कुटी आणि गडीसुर्ला गावातील रस्त्याच्या बाजुच्या शेतात मध्ये बारा फूट लांबीचा अजगर गुरूवार आज दिनांक 21/11/2024 आढळला. अजगर पाहून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सर्पमित्र उमेश झिरे आणि सदस्य याने पाच मिनिटांत अजगर पकडून निर्जनस्थळी सोडून दिला..
फिस्कुटी आणि गडीसुर्ला रस्त्याच्या बाजुच्या शेतात… आढळला 12 फूट लांबीचा अजगर. या विषयी इतर नागरिकांना माहिती दिली. काही वेळात परिसरातील नागरिक अजगर पाहण्यासाठी
घटनास्थळी जमा झाले होते. मूल येथे राहणारे संजिवन पर्यावरण संस्थेचे अध्यक्ष उमेश झिरे आणि सदस्य यांना या विषयी माहिती देण्यात आली. उमेश झिरे आणि सदस्य यांनी घटनास्थळी येऊन पाच मिनिटांमध्ये शिताफीने अजगर पकडून तो पुन्हा निर्जनस्थळी नेऊन सोडला. उमेश झिरे आणि सदस्य हे सर्पमित्र म्हणून परिसरामध्ये प्रसिद्ध आहेत. मूल मध्ये ,ग्रामीण भागा मध्ये कुठेही साप, अजगर आढळल्यास नागरिकांसह वनकर्मचारीही त्यांना बोलावत असतात. आतापर्यंत खुप सारे साप पकडून त्यांना पुन्हा जंगलात सोडून दिले आहे. अजगर पकडल्यानंतर नागरिकांनीही सुटकेचा श्वास सोडला व संजिवन पर्यावरण संस्थेचे अध्यक्षउमेश झिरे आणि सदस्य यांचे आभार मानले.