ना.सुधीर मुनगंटीवार ठरले विजय खेचून आणणारे ‘बाजीगर’

3

लोकसभेतील पराभवानंतर ना.मुनगंटीवारांनी केला होता एल्गार

लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या आणि चंद्रपूरसाठी भाजपच्या यादीत सुधीर मुनगंटीवार यांचे नाव आले. त्यांच्या इच्छेविरुद्ध घडले होते. पण तरीही पक्षाचा आदेश पाळून ते लढले. पूर्ण शक्ती लावली. काँग्रेसच्या फेक नरेटिव्हमुळे त्यांचा पराभव झाला. पण ते मुनगंटीवार आहेत. पराभव झाल्यावर पंतप्रधान मोदींच्या अभिनंदनासाठी त्यांनी सभा घेतली. ती सभा नव्हती… एल्गार होता. ‘मै चुनाव हारा हूँ… हिम्मत नहीं हारा!’. हे त्यांचे शब्द होते. विधानसभा निवडणुकीत दमदार विजय त्यांनी आपले शब्द तंतोतंत खरे ठरवले आणि ‘हार के जितने वाले को बाजीगर कहते है’ हे देखील सिध्द केले.

विधानसभा निवडणुकीत बल्लारपूर मतदारसंघातून सुधीर मुनगंटीवार यांनी 26047 मतांनी विजय मिळवला आहे. आहेत. त्यांना 104975 मते पडली असून काँग्रेसचे संतोष रावत यांना 78928 मते मिळाली आहेत. तर अपक्ष उमेदवार डॉ. अभिलाषा गावतुरे यांना 20592 मते मिळाली. एकूण 27 फेऱ्यांमध्ये मतमोजणी झाली आणि प्रत्येक फेरीत मुनगंटीवार आघाडीवर होते, हे विशेष. मुनगंटीवार यांची विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. गेल्या दहा वर्षांमध्ये बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलल्यामुळे सुधीर मुनगंटीवार यांना जनतेने कौल दिल्याचे आता सिद्ध होत आहे.

सुधीर मुनगंटीवार यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर त्यांना विधानसभेत मात देणे सोपे आहे, असे महाविकास आघाडीला वाटले होते. विशेषतः चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाने काँग्रेसच्या बाजुने कौल दिल्यामुळे काँग्रेसचा कॉन्फिडन्स वाढला होता. पण तो काँग्रेसचा अतिआत्मविश्वास ठरला. बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाला सुधीर मुनगंटीवार यांच्याशिवाय पर्याय नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा नसली तरीही त्यांनी आनंदाने पक्षाचा आदेश पाळला. मात्र, त्यांच्या पराभवानंतर मुनगंटीवारांचा जलवा कमी झाला, असा अनेकांचा गैरसमज झाला.

लोकसभेतील पराभवानंतरही मुनगंटीवार यांनी 22 जून 2024 ला बल्लारपूरला एक सभा घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अभिनंदनासाठी ही सभा होती. या सभेतील मुनगंटीवार यांचे शब्द लोक विसरलेले नव्हते. ‘मै चुनाव हारा हूं… हिम्मत नहीं हारा’ असे त्यांनी लोकांना सांगितले. त्यानंतर ते पराभव विसरून पुन्हा कामाला लागले. राज्याचे मंत्री म्हणून त्यांच्याकडे असलेल्या जबाबदारीचे उत्तमरित्या पालन केले. जनकल्याणाचा जाहीरनामा घेऊन जनतेपुढे गेले. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या जाहीरनामा समितीचे ते प्रमुख होते. जनतेची नस माहिती असलेला नेता जाहीरनामा ठरविण्याच्या प्रक्रियेत केंद्रस्थानी होता. त्यामुळे विकासाचा रथ बल्लारपूरच्या माध्यमातून पुढे जाणार, याचा विश्वास