विजेचा शॉक लागून म्हशीचा मृत्यू . हळदी शेत शिवारातील घटना.

15

मुल(प्रती)

तालुक्यातील हळदी येथील शेत शिवारात जिवंत तार तुटून म्हशीच्या अंगावर पडल्याने ईश्वर बुरांडे या शेतकऱ्याच्या म्हशीचा मृत्यू झाला. त्यामुळे परिसरात वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे शेतकऱ्यांत संताप व्यक्त करण्यात येत आहे.

नेहमीप्रमाणे हळदी येथील शेतकरी ईश्वर बुरांडे यांनी आपले घरगुती गुरढोरे चराईकरिता हळदी शेत शिवारात घेऊन गेले. नेहमीप्रमाणे गुरे चराई करीत असताना वाकून असलेल्या वीज खांबातील जिवंत तार तुटून म्हशीच्या अंगावर पडल्याने म्हशीचा जागीच मृत्यू झाला. त्यामुळे शेतकऱ्याचे अंदाजे पन्नास हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

सध्या परिसरात खरीप हंगाम सुरू आहे अशातच जिवंत तार तुटून अंगावर पडल्याने मानवी जीवितहानी झाली नाही. झालेल्या घटनेबाबत परिसरातील शेतकरी वीज वितरण कंपनीच्या कारभाराबाबत संताप व्यक्त करीत आहेत.

पुढील तपास वीज वितरण कंपनीचे अधिकारी करीत असून ईश्वर बुरांडे यांनी शासनाकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे.