आधारप्रमाणेच आता लवकरच पॅन कार्डवरही येणार क्यूआर कोड

37

आधारप्रमाणेच आता लवकरच पॅन कार्डवरही येणार क्यूआर कोड
नवी दिल्ली: घरखरेदी, कारखरेदी, जमिनीची खरेदी आदी सर्व मोठ्या व्यवहारांसासाठी पॅन क्रमांक लागत असतो. केंद्र सरकारने पॅन अपग्रेड करण्यासाठी पॅन २.० ही विशेष मोहिम सुरु केली आहे. हे कार्ड ऑपरेट करणारे सॉफ्टवेअरही खूप जुने झाले असल्याचे लक्षात
आल्याने अपग्रेड करण्याची मोहिम सुरु केली आहे. नव्या कार्डमध्ये क्यू सुद्धा असणार आहे. ज्यांनी आधीच पॅनकार्ड काढले आहे त्यांच्या निवासी पत्त्यावर हे पाठवले जाईल. नवे कार्ड काढणाऱ्यांना मात्र याचे नियमानुसार शुल्क भरावे लागणार आहे. हे कार्ड वापरासाठी सोयीचे आणि अधिक सुरक्षित असल्याचा दावा सरकारने केला आहे.

केंद्र सरकारल लवकरच पॅन कार्ड अपडेट करणार आहे. आता पॅन कार्डवर क्यु आर कोडही असणार आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्व सामान्यांना पॅन कार्ड अपडेट करण्यासाठी कुठलेही शुल्क द्यावे लागणार नाहीयेत. केंद्र सरकारने PAN2.0 प्रकल्प सुरू करण्यास मंजूरी दिली आहे.
सर्व सरकारी संस्थांमध्ये डजिटल कामकाजात पॅन कार्डाचा अधिकृतरित्या वापर व्हावा यासाठी सरकारने हा प्रकल्प हाती घेतला आहे.
या प्रकल्पामुळे करदात्यांना अनेक फायदे मिळतील. अनेक सरकारी सेवांचा त्यांना थेट फायदा घेता येणार आहेत. तसेच सरकारलाही सामान्य करदात्यांना सेवा देताना सुलभ होणार आहे. एकाच ठिकाणी सर्व माहिती मिळणार असून करदात्यांची माहितीही सुरक्षित राहणार आहे. यामुळे इको-फ्रेंडली कारभार होणार असून सरकारी पैसेही वाचतील. इतकंच नाही तर करदात्यांना आपले पॅन अपडेट करण्यासाठी कुठलेही शुल्क द्यावे लागणार नाही.