अंदाजे 80 हजाराचे नुकसान : अज्ञान व्यक्तीने लावली आग
मूल : येथून जवळच असलेल्या चांदापूर हेटी येथील शेतकरी जयंद्र लहानूजी निमकर शेतकरी महेंन्द्र लहानूजी निमगर,विजय एकनाथ देशमुख, यांनी कापणी बांधणी करून ठेवलेल्या पुंजणा—ला अज्ञान इसामाने आग लावल्यामूळे आगीत पुंजने जळून खाक झाले.
यामध्ये तीघांचेही प्रत्येकी पाउुन एकर मधील साधारण 80 हजार कीमतीचे धान जळून खाक झाले असून मूल पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केलेली आहे.तलाठी,कृषी अधिकारी यांनी घटना स्थळी भेट देवून पंचनामा केलेला आहे.
अज्ञान इसमाविरूध्द मूल पोलीसांनी गुन्हा नोंदविलेला असून पूढील चौकशी चालू आहे.
पीडित शेतकऱ्यांवर उपासमारीची पाळी आली असून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. (वार्ताहर)