स्वाधार योजनेच्या अर्ज नूतनीकरणासाठी मुदतवाढ -ऑनलाइन अर्ज करणे बंधनकारक

38

चंद्रपूर : सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाकडून अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील शासकीय वसतिगृहासाठी पात्र, परंतु जागेअभावी वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी स्वाधार योजना राबविण्यात येते. यासाठी ३० -नोव्हेंबरपर्यंत अर्ज नूतनीकरणासाठी मुदत मिळाली आहे.
२०२४-२५ या शैक्षणिक वर्षात शासकीय वसतिगृहात प्रवेश न झालेल्या विद्यार्थ्यांसाठी स्वाधार लाभ घेण्यासाठी नवीन पोर्टल विकसित करण्यात आले आहे. या पोर्टलवर विद्यार्थ्यांनी कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी मागील वर्षी स्वाधार योजनेचा ऑफलाइन अर्ज समाजकल्याण कार्यालयात भरलेला आहे, असे विद्यार्थी २०२४-२५ या कालावधीत नूतनीकरणासाठी पात्र होतात. त्यासाठी त्यासाठी पोर्टलवर एक्झिस्टिंग स्वाधार सर्व्हिस असा टॅब उपलब्ध करून देण्यात आला आहे. मागील वर्षी प्रवेशित तसेच चालू वर्षात प्रवेशित नवीन व नूतनीकरणास पात्र विद्यार्थ्यांनी पोर्टलवर स्वाधार योजनेचा अर्ज ३० नोव्हेंबर, २०२४ पर्यंत करावा. ऑनलाइन अर्जाची प्रिंट आवश्यक कागदपत्रांसह कार्यालयात जमा करणे गरजेचे आहे. या योजनेमुळे विद्यार्थ्यांना मोठा आधार मिळणार आहे.
समाजकल्याण
लाभार्थ्यांना येथे करावा लागणार अर्ज
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचे २०२४-२५
मधील नवीन व नूतनीकरणाचे
अर्जपोर्टलवर भरणे आवश्यक आहे. ■ नूतनीकरणाचा अर्ज भरताना विद्यार्थ्यांनी ‘न्यू’ ऐवजी एक्झिस्टिंग’ वर क्लिक करून स्वाधार सर्व्हिस हा पर्याय उघडावा व इयत्ता अकरावी प्रथम वर्षासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांनी न्यू टॅबवर क्लिक करून ‘स्वाधार’ पर्याय निवड करुन अर्ज करणे आवश्यक आहे.