बेंबाळ येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी साजरी

40

दिनांक 28 नोव्हेंबर 2024 रोज गुरुवार ला सायंकाळी 7 वाजता माळी समाज बेंबाळच्या वतीने क्रांतीसुर्य महात्मा फुले चौक बेंबाळ येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाप्रसंगी माळी समाज बेंबाळ चे अध्यक्ष मान. श्री. राहुल मोहुर्ले यांनी समाजातील सर्व तरुण, तरुणींना संबोधन करताना म्हणाले की, “स्वतःची व समाजाची प्रगती साधण्यासाठी प्रत्येक तरुण, तरुणींनी उच्च शिक्षणाची कास धरावी.”
कार्यक्रमस्थळी श्री. दीपक वाढई, श्री. सुनील पेटकुले, श्री. लवसन वाढई, श्री. नवनाथ वाढई, श्री. सुभाष सोनुले तसेच संपूर्ण माळी समाज बेंबाळ उपस्थित होते.