पाचवी,आठवी, शिष्यवृत्ती परीक्षेचे अर्ज भरण्यास मिळाली मुदतवाढ

25

 महाराष्ट्र राज्य परीक्षापरिषदेच्यामाध्यमातून घेतल्या जाणाऱ्याइयत्ता पाचवीआठवी शिष्यवृतपरीक्षेचे अर्ज भरण्यास ७ डिसेंबरपर्यंतमुदतवाढ देण्यात आली आहे. याआधीविद्यार्थ्यांना ३० नोव्हेंबरपर्यंत नियमित
शुल्क भरण्यास मुदत दिली होती; परंतु शाळा नोंदणी व विद्यार्थ्यांचे ऑनलाइन अर्ज भरण्यास आता मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी • दिलासा मिळाला आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये ९ फेब्रुवारी रोजी पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाणार आहे. परीक्षेसाठी शाळा नोंदणी व विद्यार्थ्यांचे ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी १७ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीपर्यंत मुदत दिली होती; परंतु ही मुदत आता वाढविण्यात आली आहे. विद्यार्थी नियमित शुल्कासह ७ डिसेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज भरू शकतील. ८ डिसेंबर ते १५ डिसेंबर या कालावधीत विलंब शुल्कासह अर्ज भरता येणार आहे. अतिविलंब शुल्कासह अर्ज भरण्याची मुदत १६ डिसेंबर ते २३ डिसेंबर असून, अतिविशेष विलंब शुल्कासह २४ डिसेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत अर्ज भरता येणार आहे. ३१ डिसेंबरनंतर विद्यार्थ्यांचे ऑनलाइन अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.