कर्मवीर महाविद्यालय मूल येथे एड्स दिनानिमित्त रॅलीचे आयोजन
मुल : शिक्षण प्रसारक मंडळ मुल द्वारा संचालित व गोंडवाना विद्यापीठ संलग्नित कर्मवीर महाविद्यालय मूलच्या रेड रिबन क्लब, राष्ट्रीय छात्र सेना, वरिष्ठ व कनिष्ठ रासेयो पथक तसेच एकात्मिक सल्ला तपासणी व तपासणी केंद्र उपजिल्हा रुग्णालय मूल यांच्या संयुक्त विद्यमाने एड्स दिनानिमित्त प्राचार्य डॉ. अनिता वाळके यांच्या नेतृत्वात एड्स जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले.
तत्पूर्वी मीना नंदनवार समुपदेशक एकात्मिक सल्ला व तपासणी केंद्र उपजिल्हा रुग्णालय मूल यांनी विद्यार्थ्याना एड्स दिनानिमित्त एड्स आजाराविषयीमार्गदर्शन केले. तसेच निखिल भेंडारे संवाद मित्र आदित्य बिर्ला ग्रुप यांनी
विद्यार्थ्यांनामानसिकआजाराविषयी मार्गदशन केले. एड्स जनजागृती रॅली कर्मवीर महाविद्यालय ते उपजिल्हा रुग्णालय मूल पर्यंत काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी सूचना फलक व घोषणाद्वारे एडस आजाराविषयी जनजागृती केली. रॅलीचा समारोप उपजिल्हा रुग्णालय मूल येथे एड्स जनजागृती विषयी शपथ घेऊन करण्यात आली. रॅली यशस्वी करण्याकरिता प्राचार्या अनिता वाळके, डॉ. कुळमेथे वैद्यकीय अधिकारी, मीना समुपदेशक, प्र. तंत्रज्ञ मयुरी कोलपॅकवार आयसीटीसी उपजिल्हा रुग्णालय मूल. प्रा. प्रवीण उपरे, डॉ. उज्वला कापगते, डॉ. अतुलपारखी, प्रा. निखिल दहीवले. प्रा. भूषण वैद्य तसेच राष्ट्रीय छात्र सेनेचे कडेट्स आणि रासेयो चे स्वयंसेवक विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.