चिमढा येथील चौधरी यांच्या शेतावर ठिंबक व आच्छादन अभ्यास दौरा आयोजित

37

आज दिनांक 6 डिसेंबर 2024 ला मौजा चिमढा ता. मुल जि. चंद्रपूर येथे CInI ( टाटा ट्रस्ट ) च्या लखपती किसान 2.0 प्रकल्प अंतर्गत 2023-2024 मध्ये ठिंबक व आच्छादन योजनेचे लाभार्थी सौ रुपाली युवराज चौधरी यांच्या शेतावर एक दिवसीय अभ्यास दौरा आयोजित करण्यात आलेला होता . यामध्ये कांतापेठ, भगवानपूर, दहेगाव, रत्नापुर व चिमढा येथील शेतकरी उपस्थित होते .
शेतकऱ्यांना खालील विषयावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले
1) ड्रीप व मल्चिंग चे फायदे समजावून सांगण्यात आले.
2) भाजीपाला पिकांचे एकत्रित नियोजन कसे करायचे यावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
3) सध्याच्या काळात आधुनिक पद्धतीने भाजीपाला लागवड करणे का गरजेचे आहे यावर सुद्धा योग्य मार्गदर्शन करण्यात आहे .
4 ) तसेच लाभार्थी शेतकरी श्री युवराज चौधरी यांनी सुध्दा स्वतःचा अनुभव सांगत शेतकऱ्यांना आधुनिक शेती करण्याचे आव्हान केले. व शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देऊन खूप मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य केले.
यावेळी CInI टाटा ट्रस्ट चे तालुका समन्वयक निखिल नागलवाडे सर, क्षेत्र समन्वयक दिनकर शेंडे सर , विजय ढोले सर व इंजि.अमित शेरकी सर उपस्थित होते.