मूल : तालुक्यातील भेजगाव येथील बौद्ध समाजाच्या वतीने शुक्रवार दिनांक (६) ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात महामानवाला अभिवादन करण्यात आले.
यावेळी गुरुवारला दिनांक (५) रात्री भजन व जागरणाचा कार्यक्रम घेण्यात आला. तर शुक्रवारला डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकांमधून उमा नदीपर्यंत प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. व उमा नदीपात्रात कार्यक्रम घेऊन महामानवाला अभिवादन करण्यात आले यावेळी बौद्ध समाजाचे अध्यक्ष प्रफुल वाकडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.तर सामूहिक भोजनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
यावेळी बौद्ध समाजाचे अध्यक्ष प्रफुल वाकडे, सचिव गुलशन लाकडे, उपाध्यक्ष मनोज गणवीर कोषाध्यक्ष सचिन गणवीर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे यशस्वी संचालन गौतम गणवीर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्नेहल लाकडे, लकी सुखदेवे, सनम गणवीर, अजय गणवीर, हिमालय लाकडे, स्वप्निल गणवीर, हिमेश उराडे, तेजस लाकडे, पौर्णिमा गणवीर, नम्रता लाकडे, शालिनी गणवीर, ज्योती गणवीर, नम्रता सुखदेवे, विशाखा गणवीर जोत्सना शेंडे, मीना गणवीर आदींनी परिश्रम घेतले.