कृषी विभागामार्फत डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना

32

 डॉ. आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा योजना
शेतकऱ्यांना अडीच लाखांऐवजी मिळणार चार लाख चंद्रपूर
कृषी विभागाच्या वतीने चंद्रपूर जिल्हा परिषदेमार्फत डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती शेतकऱ्यांकरिता राबविण्यात येते. या योजनेंतर्गत विविध लाभाच्या अनुदानात वाढ करण्यात आली आहे. विहिरीसाठी यापूर्वी २ लाख ५० हजार रुपये दिले जात होते. आता त्यात १ लाख ५० हजारांची वाढ झाली असून, थेट ४ लाख रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे.
डॉ. आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेसाठी समाज कल्याण विभाग व आदिवासी विकास विभागाकडून निधी दिला जातो. रोजगार हमी योजनेंतर्गत विहिरींच्या अनुदानात वाढ झाली. सन २०२४-२५ या वर्षीपासन वाढ झाली आहे. सिंचन विहिरीला ४ लाख, जुनी विहीर दुरुस्ती १ लाख रुपये, इनवेल बोअर ४० हजार, विद्युतजोडणी २० हजार, पंपसंचाच्या खर्चाच्या ९० टक्के किंवा ४० हजार रुपये, सौर कृषिपंप ९० टक्के किंवा ३० हजार रुपयांपर्यंत अनुदान, तुषार सूक्ष्म सिंचनासाठी १५ टक्के किंवा रुपये ४७ हजार रुपयांच्या मर्यादेत, ठिबक सिंचन संचाला १५ टक्के किंवा ९७ हजारांच्या मर्यादेत अनुदान दिले जाणार आहे. शेततळ्याचे अस्तरीकरण खर्चाच्या ९० टक्के किंवा २० हजार रुपयांपर्यंत, एचडीपीई, पीव्हीसी पाइप खर्चाच्या १०० टक्के किंवा ५० हजार रुपयांपर्यंत, बैलचलित, ट्रॅक्टरचलित औजारे- यंत्रसामग्री खरेदीकरिता ५० हजार रुपये व परसबाग-बियाणे, कलमे रोपे, खते व औषधांकरिता ५ हजार रुपये अनुदान मिळणार आहे.
प्लास्टिक
योजनेच्या लाभासाठी पात्रता काय?
नाभार्थी अनुसूचित जाती, नवबौद्ध व आदिवासी शेतकरी असावा. याच्याकडे सक्षम प्राधिकाऱ्याने देलेले जात प्रमाणपत्र आवश्यक आहे. ७/१२ उतारा, स्वतःचे आधार कार्ड, बँक खाते असावे. सदर बँक खाते आधारकार्डशी संलग्न असणे आवश्यक आहे. किमान ०.४० हेक्टर कमाल ६.०० हेक्टर शेतजमीन असलेला शेतकरी या योजनेस पात्र आहे.
लाभासाठी  कोठे करावा अर्ज ?
डॉ. आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृष क्रांती योजनेच्या भासाठी अनुसूचित जाती व जमातीच्या
शेतकयांनी
‘महाडीबीटी  पोर्टलच्या  संकेतस्थळावर अर्ज करावा. लाभार्थ्यांची निवड पोर्टलवर लॉटरीद्वारे करण्यात येते..अनुदान अदा करण्याची सर्व प्रक्रिया ऑनलाइन होते.
जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती शेतकन्यांकरिता सुरू आहे. आता राज्य शासनाने अनुदानात वाढ केली आहे. आर्थिक उन्नतीसाठी शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा. -वीरेंद्र रजपूत, जिल्हा कृषी अधिकारी, चंद्रपूर