मुल@ मारिया महाविद्यालयात माजी विद्यार्थी व पालक सभेचे आयोजन

14

मारिया महाविद्यालय येथे माजी विद्यार्थी व पालक सभेचे आयोजन
मुल मारिया महाविद्यालयात माजी विद्यार्थी व पालक सभेचे आयोजन करण्यात आले होते. शिक्षण
व्यवस्थेत विद्यार्थी जसे महत्त्वाचेअसतात, तेवढेच पालक सुद्धा महत्वस्थानीअसतात.विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासात शाळा-महाविद्यालयासोबतच विद्यार्थ्यांचे पालक सुद्धा महत्वाची भूमिका बजावत असतात.

पालक आणि शिक्षक या दोघांच्या महत्व प्रयासाने विद्यार्थी घडत असतो, या सर्व बाबींना लक्षात घेऊन मारिया महाविद्यालय मूल येथे पालक व माजी विद्यार्थी यांच्या सयुंक्त सभेचे आयोजन दि. ९ डिसेंबर २०२४ रोजी सोमवारला करण्यात आले.
या सभेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालायचे प्राचार्य डॉ. भास्कर सुकारे, प्रा. कविता शेंडे, श्रुतीकर, पालक व माजी विद्यार्थी विभाग प्रमुख प्रा. गजानन मेश्राम मंचावर उपस्थित होते. विद्यार्थ्यांना शैक्षणिक वातावरणामध्ये काय अडचणी आहेत, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाकरिता विविध उपयोजना परत कशाप्रकारे करू शकतो या विषयावर पालकांशी चर्चा करण्यात आली.

सोबतच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्याकरिता महाविद्यालय
जीवनातील अनुभव माजी विद्यार्थ्यांनी व्यक्त करून आपल्या महाविद्यालयाचा व विद्यार्थी स्वतःचं नाव कसा मोठा करू शकतो हे माझी विद्यार्थ्यांनी सभेमध्ये व्यक्त केला. पालकांनी व माजी विद्यार्थ्यांनी मांडलेल्या समस्यावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भास्कर सुकारे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये बोलताना म्हटले की विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता महाविद्यालयनेहमीचप्रयत्नशील राहील आणि त्या दृष्टीने संस्थापक जैनुद्दीन जवेरी साहेब हे नेहमी विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने योग्य निर्णय घेत असतात.

त्यांच्या मार्गदर्शनात त्यांच्या सर्वतोपरी मिळणाऱ्या सहकार्यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास अधिक कशाप्रकारे चांगला करता येईल व महाविद्यालयामध्ये सर्व आवश्यक त्या भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महाविद्यालय नेहमी विद्यार्थ्यांच्या विकासाचा निर्णय घेईल अशा शब्दात त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. माजी विद्यार्थी व पालक सभेचे नियोजनात प्रा. गीतांजली शाखत, प्राध्यापिका वैशाली साळवे, मेघा निकोडे, शंकर भगतवार, सभेचे संचालन प्रा. गजानन मेश्राम तर आभार प्रा. प्रफुल निरुडवर यांनी केले. सभेची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. (ता. प्र. )