विद्यार्थ्यांनी संकेतस्थळावर जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज करावा.शालेय पुरावे नसलेल्यांना महसुली पुरावे देखील जोडून अर्ज करता येणार आहे.वास्तविक पाहता जात वैधता प्रमाणपत्र देण्याचा कालावधी तीन महिने आहे. तरीपण, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून प्रमाणपत्र दिले जात आहे.
मागास प्रवर्गातील व्यक्तीला शिक्षण, राजकारण, नोकरी किंवा इतर कशातही आरक्षणाचा लाभ घ्यायचा असेल तर जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्राची आवश्यकता असते. आरक्षित जागांवर शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेतला किंवा नोकरी मिळवली तर जात वैधता प्रमाणपत्र सादर करणं बांधकारक असतं.
जात वैधता प्रमाणपत्रासाठी लागणारे डॉक्युमेंट/कागदपत्र
पासपोर्ट साईज फोटो
अर्जदाराचे प्रवेश पत्र (Allotment Letter)
अर्जदाराचा जन्म दाखला असल्यास
अर्जदाराचे प्राथमिक शाळेचे टीसी व तसेच निर्गम
अर्जदाराचा जातीचा दाखला
अर्जदाराच्या वडील चुलते आजोबा किंवा पंजोबा यांचे प्राथमिक शाळेचे टीसी व निर्गम उतारा
अर्जदाराच्या वडील चुलते आजोबा किंवा पंजोबा यांचे जात प्रमाणपत्र
अर्जदाराच्या नातेवाईकांकडे जात पडताळणी असल्यास जात वैधता प्रमाणपत्र
वंशावळी शपथ पत्र शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर
Affidavits
जातीचा उल्लेख असलेल्या विविध कागदपत्रे पुरावे
जातीचा उल्लेख असलेला नमुना क्रमांक 14 चा उतारा
कासरा पाहणी पत्रक चा उतारा (क पत्रक)
इतर अधिक पुरावे असल्यास, शाळेचे प्रवेश पत्र, निर्गम उतारा, सातबारा, 1967/1920/1950/1961/1995 मधील जातीचा पुरावा (तहसील, महसूल रेकॉर्डनुसार)
तसेच इतर कागदपत्र ज्यावरती तुमच्या जातीचा उल्लेख केलेला असेल ते सगळे कागदपत्रे अपलोड आणि कार्यालयामध्ये जमा करावे.
गरजू विद्यार्थ्याचे खरोखर नुकसान होत असल्यास समितीच्या सदस्यांची उपलब्धता पाहून एका दिवसात देखील प्रमाणपत्र देण्यात आले आहे.विद्यार्थ्यांनी ते ज्या महाविद्यालयात प्रवेश घेणार आहेत, तेथील कागदपत्रे घेऊन समितीकडे जात वैधता प्रमाणपत्रासाठी तत्काळ अर्ज करावा, असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे. प्रमाणपत्र न मिळाल्याने कोणाचा प्रवेश रद्द झाला किंवा प्रवेश मिळू शकला नाही, असे प्रकार होणार नाहीत, याची दक्षता समितीकडून घेतली जात आहे. ‘ही’ कागदपत्रे आवश्यकच… • – संबंधित कॉलेजचे पत्र व चालू शैक्षणिक वर्षाचे बोनाफाईड • – अर्जावर संबंधित कॉलेजच्या प्राचार्यांची स्वाक्षरी, शिक्का शिवाय अर्जदाराचा फोटो •– अर्जदाराचा शाळा सोडल्याचा दाखला, पहिलीचा प्रवेश निर्गम उतारा • -अर्जदाराचा जातीचा दाखला झेरॉक्स प्रत • अर्जदार वडिलांचा शाळेचा दाखला, पहिलीचा प्रवेश निर्गमन उतारा व जातीचा दाखला, वडील अशिक्षित असल्यास तसे शपथपत्र •– अर्जदाराची आत्या, चुलत्याचा शाळा सोडल्याचा दाखला • – अर्जदाराचे आजोबा किंवा चुलत आजोबांचा शाळा सोडल्याचा दाखला • – इतर महसुली पुरावे (गाव न. सात, टॅक्स पावती, खरेदीखत, सहा-ड, फेरफार उतारा, गहाणखत, मालमत्तापत्रक) •• – वंशावळ नमुना नं. तीन कोऱ्या कागदावर शपथपत्र व फॉर्म नं. १७ (शपथपत्र). प्रमाणपत्राअभावी कोणालाही प्रवेशाला मुकावे लागणार नाही विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी जात वैधता प्रमाणपत्र मिळावे म्हणून वेळेत अर्ज करावेत. सुरवातीला समितीच्या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करावा. त्या अर्जाची स्वॉप्ट कॉपी कार्यालयात आणून जमा करावी. त्याची पडताळणी होऊन संबंधित विद्यार्थ्यास आठ-दहा दिवसांत प्रमाणपत्र देण्याचा समितीचा प्रयत्न असणार आहे. कोणत्याही विद्यार्थ्याचा प्रवेश जात वैधता प्रमाणपत्र नसल्याने रद्द होणार नाही.