मूल ११: कृषि महाविद्यालय मूल येथे *“ फिट इंडिया वीक-२०२४”* कार्यक्रम अंतर्गत दिनांक १० ते १८ डिसेंबर या कालावधी मध्ये विविध उपक्रम / कार्यक्रम जसे योग व ध्यान, निबंध स्पर्धा, पोस्टर स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, प्रश्नमंजुषा स्पर्धा, स्वस्थ राहण्याबाबतची शपथ व देशी खेळ इत्यादि महाविद्यालयात राबविण्यात येत आहे.
दिनांक ११ डिसेंबर २०२४ रोजी *“योग व ध्यान”* हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता *डॉ. विष्णुकांत टेकाळे* लाभलेले होते. यांनी सर्वप्रथम सांगितले की, आपला देश विविध क्षेत्रामध्ये जसे तंत्रज्ञान, साधनसामग्री, आर्थिकदृष्ट्या प्रगती पथावर आहे, पण दैनंदिन जीवन जगतांनी सर्वात महत्वाचा भाग म्हणजे आपली शारीरिक व मानसिक आरोग्य चांगले असणे गरजेचे आहे. फिट इंडिया वीक-२०२४ याचा मुख्य उद्देश आरोग्यदायी जीवनशैलीला प्रोत्साहन देणे व देशाच्या नागरिकाला शारीरिक व मानसिकरीत्या स्वस्थ ठेवणे हा असल्याचे सांगितले. विद्यार्थांनी शिक्षणासोबत शारीरिक आणि मानसिक स्वास्थ बनविण्यासाठी योग आणि ध्यानाचा अवलंब दैनंदिन जीवनात करून आपले स्वास्थ चांगले करावे आणि योग व ध्यानाचे महत्त्व नागरिकांना सांगुण त्यांचे स्वास्थ सुधारण्यास मदत करावी. जेणेकरून आपल्या भारताचा प्रत्येक नागरिक हा शारीरिक व मानसिक दृष्ट्या सुदृढ होईल. सदर कार्याक्रमप्रसंगी *कु. चैताली बेलेकर* व *श्याम धानोरे* या विद्यार्थ्यांनी विविध योगासने जसे ताडासन, वीरभद्रासन, त्रिकोणासन, वृक्षासन, अर्ध पद्मासन, बध्दकोनासन, भूजंगासन, बालासन, सूर्यनमस्कार इत्यादि करून घेतले. त्यानंतर *प्रा. मोहिनी पुनसे* यांनी मानसिक आरोग्य चांगले राहण्यासाठी *ध्यानाचे महत्त्व* त्याचप्रमाणे ध्यानाद्वारे विद्यार्थ्याची एकाग्रता वाढण्यास मदत होते व आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये येणारा तान-तणाव आपण सहज कमी करू शकतो असे त्यांनी सांगितले व उपस्थितांकडून पाच मिनिटे *ध्यान करून घेतले.*
सदर फीट इंडिया कार्यक्रम २०२४ अंतर्गत दिनांक १० डिसेंबर २०२४ रोजी महाविद्यालयात *निबंध स्पर्धा आयोजित* करण्यात आली व या स्पर्धेचा विषय *“आरोग्य हीच संपत्ती”* हा होता. त्यामध्ये एकूण *५६ विद्यार्थ्यानी सहभाग* नोंदविला होता. या शिवाय महाविद्यालयात पोस्टर स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, प्रश्नमंजुषा स्पर्धा, स्वस्थ राहण्याबाबतची शपथ व देशी खेळ इत्यादि कार्यक्रम पुढे होणार आहेत. सदर योग व ध्यान कार्यक्रमास *१३० विद्यार्थी व २० प्रध्यापाकवृंद उपस्थित होते.* उपस्थितांचे आभार *प्रा. देवानंद कुसुंबे* यांनी मानले सदर कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता *प्रा. मोहिनी पुनसे* आणि *प्रा. देवानंद कुसुंबे* यांनी मोलाची कामगिरी केली.