परभणतील संविधान विटंबनेच्या घटनेसंदर्भात संबंधितावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा

14

परभणतील संविधान विटंबनेच्या घटनेसंदर्भात संबंधितावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी
मागणी वंचित बहुजन आघाडी पुरुष व महिला शाखा तथा भारतीय बौद्ध महासभा शहर व तालुका
शाखेच्या वतीने तालुका मूल, जिल्हा- चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने मा. देवेंद्रजी फडणवीस
मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन
मार्फत:- तहसीलदार साहेब, तहसील कार्यालय मूल, तालुका मूल, जिल्हा चंद्रपूर

देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.
परभणी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात संविधानाची प्रत ठेवण्यात आली होती. एका व्यक्तीने त्या प्रतीची मोडतोड करून विटंबना केल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे.
या प्रकरणी आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करून त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची निवेदनात करण्यात आली आहे.