शेतशिवारातून १५ धानाचे पोते चोरी@ भुरट्या चोरांचा सुळसुळाट

5

हळदी येथील शेतशिवारात ठेवलेल्या 15 धानाचे पोते भुरट्या चोरांनी चोरून नेल्याची घटना (दि.16) डिसेंबर 2024 रोजी मूल तालुक्यातील हळदी येथे उघडीस आली असून, भगवान दादाजी चलाख नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांचे नाव आहे.
चलाख हळदी परिसरात शेतीजमीन असून, शेतातून धानाची मळणी केली व पोते भरून शेतात ठेवले होते. रात्रीच्या सुमारास घरी आणण्याचे शक्य झाले नाही. त्यामुळे त्यांनी धानाचे पोते शेतातच ठेवले होते. आणि सकाळी घरी आणण्याच्या दृष्टीने सकाळी उठल्यानंतर शेतात गेले.धानाचे उत्पादन 15 पोते इतके झाले असल्याचे त्यांनी सांगितले.
मात्र सकाळी शेतात ठेवल्या स्थळावर गेल्यानंतर त्यातील 15 पोते चोरीला गेल्यामुळे सरासरी हजारोची नुकसान भगवान दादाजी चलाख यांची झाली आहे. अशा घटना दरवर्षी होतच असतात तेव्हा यावर शेवटी शेतकरी हार मानून आपले उदरनिर्वाहाची भटकत असल्याचे निदर्शनास नेहमी येते.
नुकसान ग्रस्त शेतकरी यांचे चोरी झाल्याने परिवाराला मोठा धक्का बसला असून हळदी परिसरात सर्वत्र चर्चेला उधाण आले आहे व शोधाशोधसाठी हतबल झाले, सदर घटनेची तक्रार मूल पोलीस ठाण्यात देण्यात आली.