भटक्या विमुक्त जातींना मिळणार घरकुल योजनेचा लाभ

3

चंद्रपूर : विमुक्त जाती भटक्या माती व धनगर समाज प्रवर्गातील समाज बांधवांनी घरकुल योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.ग्रामीण क्षेत्रासाठी सबंधित ग्रामपंचायत अंतर्गत ठराव घेवुन घरकुल योजनेकरीता पात्र अर्जदारांचे ग्रामपंचायतीच्या माध्यमाने पंचायत समिती,गटविकास अधिकारी यांचे मार्फतसहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयास यादीसह प्रस्ताव सादर करावे. विमुक्त जाती, भटक्या जमाती तसेच धनगर समाज या प्रवर्गातील कुटुंबाचे राहणीमान उंचावणे, त्यांचे उत्पन्नाचे स्त्रोत वाढुन त्यांना स्थिरता प्राप्त व्हावी, त्याना विकासाच्या मुळ प्रवाहात येता यावे. या उद्देशाने राज्यात सामाजिक
न्यायविशेष सहाय्य विभागामार्फत ग्रामीण भागातील विमुक्त जाती, भटक्या जमाती प्रवर्गातील घटकांसाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना तसेच धनगर समाज,भटक्या जमाती क प्रवर्गाच्या विकासासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना इतर मागास बहुजन कल्याण विभागाअंतर्गत राबविण्यात येत आहे. ग्रामीण भागात किमान १० कुटुंबासाठी सामुहिक वसाहन योजना राबवून अथवा रमाई आवास योजनेच्या धर्तीवर वैयक्तिक स्वरुपात घरकुलाचा लाभ देण्यात येतो. अधिक माहितीसाठी ग्रामपंचायत कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन होत आहे.