न.प.मूल येथील प्रभाग क्रमांक 12 मधील असलेल्या रस्त्यावर वीज वितरण कंपनीने मागील काही वर्षांपूर्वी नागरिकांना घरगुती लाईनचा विद्युत पुरवठा करण्यासाठी रस्त्याच्या मधोमध विद्युत खांब उभा करण्यात आल्याने हा खांब आता वाहतुकीसाठी अडसर ठरत आहे.
वीज वितरण कंपनीने नागरिकांना घरगुती विजेचा पुरवठा करण्यासाठी वीजजोडणी करण्यात आली.त्यावेळी रस्ता रूंद होते पण आता वस्ती मोठी झाल्याने लोकवस्ती वाढल्याने जाण्यायेण्यासाठी रस्ता सरळ झाल्याने वाहतूकीसाठी खांबा आड येत असल्याने जुन्या वस्तीमधील नागरीकांना त्रास सहन करावा लागत आहे.रस्त्याच्या मधोमध वीज खांब उभा केल्याने येथील नागरिकांना ये-जा करण्यासाठी कमालीचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.नागरिकांनी न.प.मूल प्रशासनाला निवेदन दिले होते.वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना कित्येकदा पत्रव्यवहार केले. परंतु वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून या गंभीर प्रकाराकडे कानाडोळा करीत असल्याची बाब समोर येत आहे.
रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या या खांबामुळे वाहनचालकांना मोठा त्रास होत आहे. विशेषतः रात्रभर अंधाराच्या वेळी ते खांब ओलांडताना अपघात होण्याची शक्यता दाट वर्तवली जात आहे. याशिवाय, सुसाट वेगाने येणारी वाहने यामुळे या खांबांमुळे धोका निर्माण झाला आहे. रस्त्याच्या योग्य बाजूस खांब हलविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.त्या ठिकाणी नवीन पध्दतीचे खांब बसविण्यात यावे.
रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या खांबाबाबत अनेकदा निवेदन दिले. परंतु या गंभीर समस्येकडे वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.
-अलिम पठाण मूल वार्ड क्रमांक 12 जुनी वस्ती विश्रामगृह समोर