शिक्षण प्रसारक मंडळ मुल द्वारा संचालित कर्मवीर महाविद्यालय मूल येथिल रा.से.यो + २ व मोटर वाहन कार्यालय चंद्रपूर (आरटीओ) यांच्या संयुक्त विद्यमानाने “रस्ते सुरक्षा अभियान” जनजागृतीकार्यशाळेचे आयोजन महाविद्यालयात करण्यात आले.या कार्यक्रमाला अध्यक्षा म्हणून मान. प्राचार्या डॉ.अनिता वाळके व विशेष प्रमुख अतिथी म्हणून मान. श्री.अंशुल मुर्डवी सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक चंद्रपूर तसेच मान. श्री. निखिल गायकवाड सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक चंद्रपूर तसेच महाविद्यालयीन पर्यवेक्षक प्रा.श्री.दिनेश बनकर कार्यक्रमाला उपस्थित होते. या कार्यक्रमाप्रसंगी प्राचार्य डॉ.अनिता वाळके यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून “सुरक्षित जीवन का अर्थ है,सुरक्षा बिना सब व्यर्थ है” असे स्लोगन बोलून भाषणाची सुरुवात केली, विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षेचा सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे कुशल आणि सावधपणे वाहन चालवणे, वेग मर्यादा पाळणे,शिस्तबद्ध ड्रायव्हिंग संस्कृती राखणे, गरजेचे आहे असे आपल्या मार्गदर्शनातून आव्हान केले. मान. श्री अंशुल मुर्डवी यांनी भाषणातून दर वर्षी अंदाजे दीड लाख लोक अपघाती मृत्यू पडतात. वयाचे1१८ वर्षे पूर्ण झाले नसतील व परवाना नसेल तर विद्यार्थ्यांनी गाडी चालवू नये,तसेच अपघात झाले असल्यास १०८ वर काल करून ॲम्बुलन्स बोलावून अपघात झालेल्या व्यक्तीला मदत करावी असे मार्गदर्शन केले. मान. श्री निखिल गायकवाड यांनी मार्गदर्शनातून हेल्मेट लावूनच वाहन चालवावे, रस्त्याने चालताना उजव्या साईडनी चालावे व जपून चालवे असे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाला पर्यवेक्षक प्रा.श्री.दिनेश बनकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले ,ज्यांनी आपल्या प्रास्ताविकतेत “जान भली की गाडी भली सडक कहती सुरक्षा भली “व इतर माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा.नीरज चन्ने यांनी केले.या कार्यक्रमाला ,प्रा.पडोळे,प्रा.डोंगरवार प्रा.बोधे प्रा.सेलेकर प्रा.लेनगुरे प्रा.दहीवले प्रा. अलुरवार प्रा.धोडरे व सर्व विद्यार्थी व विद्याथिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.