शेतकऱ्यांना देणारी विविध अनुदाने रखडली

15

निवडणूक आटोपली अन् शेतकऱ्यांना देणारी विविध अनुदाने रखडली
 विधानसभा निवडणुकीपूर्वी ती जिंकता यावी म्हणून विविध पक्षांनी शेतकऱ्यांना आकर्षित करण्यासाठी जुन्या चालू असलेल्या अनुदानाच्या योजनेस भवांतर योजना, अतिवृष्टी नुकसानभरपाई, कर्जमाफी, या नवीन योजनांद्वारा शेतकऱ्यांना अनुदान देण्याचे आश्वासन
दिले होते. निवडणूक होऊन दोन महिने उलटले तरीही अनेक योजनांतील अनुदानाचा लाभ अद्यापही शेतकऱ्यांना मिळाला नाही. तो देण्यात शासन धरसोड करीत असून ही अनुदाने रखडली आहेत.
पीक विमा योजनेत अनेक शेतकऱ्यांनी नैसर्गिक आपत्ती अंतर्गत ७२ तासांच्या आत तक्रार दाखल करूनही केवळ पाहणी करणे व अनुदान देऊ एवढेच सांगितले जाते. अनुदानाचा मात्र पत्ताच नाही. दरवर्षी शासन वण्य प्राण्यांनी शेतातील पिकांची नासाडी केल्यास वन विभागाकडे तक्रार
केल्यास
नुकसानभरपाई म्हणून आर्थिक मदत करते. ही मदत शासनाचा वनविभाग तक्रारी नंतर एक महिन्यात देत असते; पण यंदा मात्र एकही शेतकऱ्यांना नुकसानभरपाई दिली नाही. चौकशी केली असता शासनाकडून या विभागाला रक्कम प्राप्त झाली नसल्याचे समजले.
प्रोत्साहन अनुदानही थांबले
शेतकऱ्यांना जातीनिहाय पिकावरील फवारणीसाठी कीटकनाशक औषधीवर होणाऱ्या खर्चासाठी अनुदान दिले जाते. यंदा ते रखडले असल्याचे चित्र आहे. ज्या शेतकऱ्यांनी नियमितपणे कर्जफेड केली त्यांना मिळणारे ५० हजारांचे प्रोत्साहन अनुदान देखील गेल्या अनेक काळापासून रखडले आहे. यासह निराधार योजना, श्रावण बाळ योजना, सुशिक्षित बेरोजगारांना शाळांमधील रिक्त जागांवर ६ महिन्यांच्या मुदतीसाठी कंत्राटी म्हणून नेमले त्यांचा मेहनताना देण्यात देखील शासन नियमितता पाळू शकत नाही. त्यामुळे सरकारने आता शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या विविध अनुदान तसेच योजनांचा लाभ तत्काळ द्यावा, अशी मागणी होत आहे.मी नियमितपणे बँकेची कर्जफेड केली. माझे नाव प्रोत्साहन अनुदान यादीत आहे; मात्र मलामागील अनेक काळापासून ५० हजारांचे प्रोत्साहन अनुदानच मिळाले नाही.शेतकरी.खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे माझ्या शेतातील तुरीचे पीक जळून गेले. त्याची ७२ तासांच्या आत तक्रार केली. नुकसानीची विमा प्रतिनिधींनी पाहणी केली. त्याला सहा महिने झाले अद्यापही नुकसानभरपाई मिळाली नाही.
शेतकरी