मुल पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांनी हातात घेतला स्वच्छतेचा विडा

3

श्रमदानातून कार्यालयाची स्वच्छता
मुल पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांनी हातात घेतला स्वच्छतेचा विडा
मुलः कार्यालय व परिसराची स्वच्छता राहावी व त्यातून चांगला संदेश ग्रामस्थांपर्यंत पोहोचावा स्वच्छतेतून समृद्धी साधता यावी याकरिता मूल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी बि. एच. राठोड यांनी स्वच्छतेचा विळा उचलला असून स्वच्छता दूतासारखे दररोज कार्यालय व परिसरातील पटांगण नियमितपणे स्वच्छ करीत आहेत. त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्याच्या या कामात कार्यालयातील कर्मचाऱ्यांचीही साथ लाभत आहे.
गटविकास अधिकारी राठोड शांत, संयमी, निगर्वी स्वभावाचे धनी असल्याने त्यांच्या या कार्याला सर्वांचीच साथ मिळत आहे. कार्यालयाकडे अनेक कार्यालय प्रमुखांचे दुर्लक्ष होत असल्याचे पहावयास मिळते. असे असताना मूलचे बिडिओ कार्यालय व परिसर स्वच्छ ठेवण्यात गुंतले असल्याने पंचायत समिती कार्यालय परिसर स्वच्छ व सुंदर झाला आहे. जिल्हा परिषद व ग्रामपंचायत यातील महत्त्वाचा दुवा म्हणून पंचायत समितीला ओळखले जाते. पंचायत समितीच्या माध्यमातून ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामविकास साधला जातो. पंचायत समितीच्या माध्यमातून गावागावात संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान राबविले जाते व मूल्यांकन करून संबंधित गावांना पुरस्कारही दिला जातो मात्र सद्यस्थितीत गावागावातील स्वच्छता मोहीम ही मंदावल्याचे चित्र आहे. आपण स्वच्छ गाव स्वच्छ, घर स्वच्छ, तर कार्यलय स्वच्छ अशा म्हणीप्रमाणे मुल पंचायत समितीने आपल्याच कार्यालयातून स्वच्छतेची सुरुवात केली असून गावागावात ग्रामपंचायतने स्वच्छ व सुंदर ठेवण्याचा संकल्प गटविकास अधिकाऱ्यांनी तालुक्यातील सर्व विस्तार अधिकारी ग्रामसेवक व प्रथम नागरिक म्हणून सरपंच यांना देखील चांगला संदेश दिला आहे.
कार्यालय परिसर झाले स्वच्छ व सुंदर
मूल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी बि. एच. राठोड यांनी स्वच्छतेचा विळा उचलला असून स्वच्छता दूतासारखे दररोज कार्यालय व परिसरातील पटांगण नियमितपणे स्वच्छ करीत आहेत. त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्याच्या या कामात कार्यालयातील कर्मचाऱ्यांचीही साथ लाभत आहे. राठोड साहेब शांत, संयमी, निगर्वी स्वभावाचे धनी असल्याने त्यांच्या या कार्याला सर्वांचीच साथ मिळत आहे. कार्यालयाकडे अनेक कार्यालय प्रमुखांचे दुर्लक्ष होत असल्याचे पहावयास मिळते. असे असताना मूलचे बिडिओ कार्यालय व परिसर स्वच्छ ठेवण्यात गुंतले असल्याने पंचायत समिती कार्यालय परिसर स्वच्छ व सुंदर झाला आहे.