महिला,ग्राहक जागृती काळाची गरज!-दीपक देशपांडे

28

मूल प्रतिनिधी.

आज बाजारपेठ सजली आहे ,ती नानाविध आमिषांनी आणि ग्राहकाची फसवणूक मोठ्या प्रमाणात सुरू आहे , अशावेळी या विषयावर समाजजागृती करण्यासाठी ग्राहक संघटनांची जबाबदारी मोठी आहे.
संघटित व्यापारी दररोज फसवणूकीचे नवनवीन फंडे शोधून काढत आहेत मात्र ग्राहक मी कशी तक्रार करु? समाज काय म्हणेल?या प्रश्नाचे न सापडणारे उत्तर शोधण्याचा अयशस्वी प्रयत्न करीत आपापसांत आणि आपलाच आपण लढतो आहे , ही बाब पटवून देत जनतेचा विश्वास संपादन करायचा असेल आणि फसवणूक टाळायची असेल तर महिलांचा सहभाग वाढविणे आवश्यक आहे आणि त्यांच्यात आपल्या गरजा आणि खरेदीचे महत्त्व पटवून देण्यासाठी या चळवळीत सक्रिय कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी आपल्या सहकारी गृहिणींचा व समाजातील अग्रणी महिलांचा या कार्यात सहभाग वाढविणे आणि त्यांच्या माध्यमातून समाजातील स्त्री वर्गात ग्राहकांचे हक्क आणि अधिकार व फसवणूक प्रकारांची माहिती करुन देण्याची नितांत आवश्यकता असल्याचे प्रतिपादन जागृत ग्राहक राजा संघटनेचे अध्यक्ष दीपक देशपांडे यांनी केले.

एकीकडे २६जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने सगळीकडे(Enjoyment) उत्सव साजरा करुन हा दिवस मनोरंजन आणि छोट्या मोठ्या कार्यक्रमांनी साजरा करण्यात समाज व्यस्त असताना जागृत ग्राहक राजा या ग्राहक संघटनेचे वतीने समाजहित जपण्यासाठी व समाज जागृतीसाठी एका चिंतन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

दीपक देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या बैठकीत जागृत ग्राहक राजा या संघटनेच्या कार्यविस्ताराबाबत आणि भविष्यात करावयाच्या कार्यक्रमाचे नियोजनाबाबत विचार विनिमय करून पुढिल रुपरेषा ठरविण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती.

उपस्थित मान्यवरांनी केलेल्या सुचना आणि विचार विनिमयातून एक गोष्ट स्पष्ट झाली की समाजात फसवणूकीच्या घटना दिवसेंदिवस वाढत असताना आपल्याच अज्ञानामुळे आपण आपली फसवणूक करुन घेण्यासाठी कारणीभूत ठरत आहोत कारण वेगवेगळ्या जाहिराती आणि आमिषाला बळी पडून आपण खात्री न करता काही वस्तू सेल एकावर एक फ्री किंवा जाहिराती आणि आँनलाईन वेगवेगळ्या ऑफरमुळे खरेदी करतो आहोत आणि मग काही दिवसांनी त्या वस्तू खराब निघाल्या की आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले की आपणच आपल्याला दोष देत असतो , त्यामुळे उपभोगावर संयम आणि भुलथापांना बळी न पडता आवश्यक तेवढीच खरेदी करण्यासाठी लोकजागृती करण्याची आवश्यकता याप्रसंगी झालेल्या चर्चेनंतर स्पष्ट करण्यात आली.

त्यामुळे गृहिणींचा सहभाग आणि महिलांच्या प्रबोधनावर भर देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.यासाठी या चळवळीत सहभागी प्रत्येकाने सपत्नीक सहभागी होण्याची आवश्यकता व त्यादृष्टीने प्रयत्न सुरू करण्याचाही महत्वपूर्ण निर्णय घेतला गेला , यामुळे या चळवळीला कौटुंबिक सहभाग व समाजाचा स्नेह व आदर प्राप्त करणे अधिक सोयिस्कर होईल असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आणि त्यावर तातडीने अंमलही सुरू करण्यात आला आहे.

सुरुवातीला दीपक देशपांडे आणि दर्शना देशपांडे यांनी स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करुन पुष्पमाला अर्पण करीत दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली,

या बैठकीत दीपक देशपांडे, रमेश डांगरे, तुळशीराम बांगरे, प्रमोद मशाखेत्री. डॉ.आनंदराव कुळे, दिलीप कटलोजवार, भास्कर बुरांडे ,सौ.दर्शना देशपांडे, सौ.किर्ती बांगरे , सौ.वैशाली मशाखेत्री आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
याच निमित्ताने समाजातील, फसवणूक व शोषण पिडितांसाठी कार्य करु इच्छिणाऱ्या महिलांनी पुढे येत या चळवळीत सहभागी होण्याचे आवाहन या सभेला उपस्थित असणाऱ्या दर्शना देशपांडे किर्ती डांगरे आणि वैशाली मशाखेत्री यांनी केले आहे.