मूल : तालुक्यातील डोंगरगाव येथील शेतकरी युवराज रामचंद्र वासेकर वय (४०) यांनी सततच्या नापिकीमुळे व कर्जापाइ आपल्याच शेतात आंब्याच्या झाडाला दोर बांधून आत्महत्या केल्याने डोंगरगावात खळबळ माजली असून गावात हळहळ व्यक्त केल्या जात आहे.
घटनेचे वृत्त असे की, दिनांक ८/४/२०२५ रोजी मृतक शेतकरी युवराज वासेकर हा नेहमीप्रमाणे सकाळी ११-३० च्या दरम्यान उमा नदीच्या काठावर लागून असलेल्या शेतात धानाचे डबल फसल उत्पन्न लावले होते.
त्यासाठी तो आपल्या शेतात शेतीचे काम करण्यासाठी व धानाला पाणी देण्यासाठी गेला. काम करीत असतानाच त्याला त्याच्यावर असलेल्या कर्जाची चिंता कदाचित सतावतच असावी, याच कारणाने आपण शेतात राब राब राबवूनही हाती काही लागत नाही, हा विचार मनामध्ये आणून असलेल्या आंब्याच्या झाडाला दोर बांधून गळफास घेऊन स्वतः आत्महत्या केली.
याबाबतची माहिती त्याच्याच शेताजवळ असलेल्या शेतकऱ्यांनी गावात दिली असता त्याच्या कुटुंबियांनी व गावकऱ्यांनी घटना स्थळाकडे धाव घेतली. याबाबतची माहिती पोलिस स्टेशन मुल येथेदीली असता तात्काळ पोलिस घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.
आणि मृतकाचा मृतदेह शव विचेदनासाठी सायंकाळी चार वाजता उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले.
मृतक शेतकरी युवराज वासेकर याला पत्नी, मुलगा, मुलगी, आई वडील असा मोठा परिवार आहे.
पुढील तपास परी उपविभागीय पोलिस अधिकारी प्रमोद चौगुले यांचे मार्गदर्शनाखाली पी.हेड.कन्स्टेबल काटकर करीत आहेत.