‘आपले सरकार’ पोर्टल सेवा पाच दिवस राहणार बंद

19

महाराष्ट्र राज्य शासनाच्या विविध विभागांच्या सेवा ‘आपले सरकार’
पोर्टलवरून प्रदान केल्या जातात.
महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ
मर्यादित (महाआयटी) यांनी हे पोर्टल
विकसित केले आहे. या पोर्टलची नियमित देखभाल आणि तांत्रिक
नासाठी गुरुवार १० एप्रिल ते १४
एप्रिलपर्यंत पाच दिवस या पोर्टलची सेवा बंद राहणार आहे.