मुल तलावात महिलेनी केली आत्महत्या.

74

मुल – मुल तलावात एका महिलेने आत्महत्या केल्याची घटना घडली असून सदरहू महिला ही बागेगावची असल्याचे सांगण्यात आले. दिनांक १७/४/२०२५ रोजी दुपारी ४ वाजताच्या दरम्यान मुल तलावात एका महिलेचे प्रेत पाण्यात तरंगताना दिसून आल्याने तिला पाण्याच्या बाहेर काढले असता महिलेच्या बॅग मध्ये आधारकार्ड सोडल्याने त्यावरून तिची ओळख पटली. महिलेचे नाव शीला शरद मसराम वय (६०) वर्ष रा.गडचिरोली वॉर्ड क्रमांक 7 कॅम्प एरिया गडचिरोली असल्याचे तपासावरून सांगण्यात आले. महिला ही डोक्याच्या आजाराने त्रस्त असून मनोरुग्ण असल्याने ती आपल्या उपचारासाठी चंद्रपूरला जायला निघाली परंतु ती आपल्या मानसिकतेत तिने स्वतःच तलावात उडी घेऊन आत्महत्या केल्याचे सिद्ध झाले. पोलिसांनी सदर महिलेला नातेवाईकांना माहिती दिल्याने तिचे नातेवाईक मुल येथे सायंकाळी दाखल झाले. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक प्रमोद चौगुले यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस अंकुश मांदाळे, धांडे करीत आहेत.