अरविंद करपे यांची निवड

38

मूल : समाजहिताची तळमळ, वंजारी सेवा संघात काम करण्याची दाखविलेली आवड आणि त्यांनी हातात घेतलेले समाजकार्य बघून अरविंद रामदास करपे यांची वंजारी सेवा संघ, महाराष्ट्रच्या चंद्रपूर तालुकाध्यक्षपदी वंजारी सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष सुमित एस. करपे यांनी निवड केली. सामाजिक ऋण फेडण्यासाठी समाजसेवेचे व्रत घेऊन वंजारी समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक उन्नतीसाठी कटिबद्ध असावे, अशी अपेक्षा त्यांच्याकडून व्यक्त होत
आहे.