महाज्योतीतर्फे TAIT ऑनलाइन परीक्षापूर्व प्रशिक्षण– अर्ज प्रक्रियेला सुरुवात

32

प्रतिनिधी / नागपूर (Nagpur) : महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूर या स्वायत्त संस्थेमार्फत राज्यातील इतर मागास वर्ग (ओबीसी), विमुक्त जाती-भटक्या जमाती (व्हीजेएनटी) व विशेष मागास प्रवर्गातील (एस.बी.सी) विद्यार्थ्यांसाठी मोफत स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण राबविण्यात येते. यंदाच्या वर्षी शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी (टीएआईटी) भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. सन २०२५-२६ या वर्षातील टीएआईटी परीक्षेसाठी मोफत ऑनलाईन प्रशिक्षणासाठी महाज्योतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया ८ एप्रिल २०२५ रोजी पासून सुरु केलेली आहे.

सदरचे अर्ज महाज्योतीच्या www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावर मागविण्यात आले आहेत. महाज्योती मार्फत शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी (टीएआईटी) पूर्व प्रशिक्षण या ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्ण संधी उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. प्रशिक्षणाबाबतचे सर्व तपशील, निकष, अटी व शर्ती तसेच अर्ज करण्याची सविस्तर प्रक्रिया याबाबतची माहिती www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. उपरोक्त परीक्षेची तयारी करणाऱ्या इच्छुक विद्यार्थ्यांनी या सुवर्ण संधीचा लाभ घेण्याचे आवाहन महाज्योतीचे प्र. व्यवस्थापकीय संचालक प्रशांत वावगे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

महाज्योती मार्फत विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रशिक्षण हे नामांकित प्रशिक्षण संस्थांमार्फत देण्यात येणार. प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांची निवड ही TET/CTET Paper-I/II/B.Ed मध्ये प्राप्त झालेल्या गुणांकाच्या आधारे मेरीटच्या आधारे निकषांनुसार अंतिम निवड करण्यात येणार आहे, असल्याचेही महाज्योतीचे प्र. व्यवस्थापकीय संचालक प्रशांत वावगे यांनी सांगितले. महाज्योती च्या विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात येत्या २० एप्रिल २०२५ पर्यंत ऑनलाईन अर्ज भरायचा आहे. या प्रशिक्षणाचा मोठ्या प्रमाणात महाज्योतीच्या विद्यार्थ्यांनी घ्यावे असे आवाहन महाज्योतीचे प्र. व्यवस्थापकीय संचालक प्रशांत वावगे यांनी केलेले आहे. अधिक माहितीसाठी ०७१२-२८७०१२०/१२१ या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहनही महाज्योतीचे प्र. व्यवस्थापकीय संचालक प्रशांत वावगे यांनी केले.

मुल्याधिष्ठ शिक्षणाचा प्रसार करण्याचा शासनाचा प्रयत्न : मंत्री अतुल सावे
महाराष्ट्र शासन सध्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (एनईपी) २०२० अंमलात आणत आहे. राज्यातील इतर मागास वर्ग (ओबीसी), विमुक्त जाती भटक्या जमाती (व्हीजेएनटी) व विशेष मागास प्रवर्ग (एसबीसी) प्रवर्गातील टीएआईटी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महाज्योती नवीन शासकीय शिक्षण धोरणाला अनुसरून ऑनलाईन प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे.

अशी माहिती प्रसिद्धी पत्राद्वारे महाज्योतीचे अध्यक्ष तथा इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री अतुल सावे यांनी दिली आहे. मंत्री अतुल सावे यांनी सांगितले की, या ऑनलाईन प्रशिक्षणातून ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना घरी बसून तज्ञ मार्गदर्शकांचे मार्गदर्शन मिळावे. तसेच शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी (टीएआईटी) परीक्षेपूर्व प्रशिक्षण ऑनलाईन स्वरूपात देण्याचा निर्णय महाज्योतीतर्फे घेण्यात आले आहे. महाज्यातीकडे अर्ज करून निवड झालेल्या विद्यार्थ्यांना लाईव्ह स्ट्रीमिंग व रेकॉर्ड व्हिडिओच्या माध्यमातून प्रशिक्षण घेता येणार आहे. शासनाच्या दर्जेदार व गुणवत्तापूर्ण प्रशिक्षणातून भविष्यात घडणारी शिक्षकांची फळी हे राज्यातील मुल्याधिष्ठ शिक्षणाची ज्योत पेटविण्यास हातभार लावणार असा विश्वास महाज्योतीचे अध्यक्ष तथा इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री अतुल सावे यांनी व्यक्त केले आहे.