मूल :—लोकसभेच्या निवडणुका झाल्या, विधानसभेच्याही निवडणुका झाल्या, गावातील निवडणुका मात्र ठप्प झाल्या आहेत. ग्रामपंचायतींसाठी २०२५ ते २०३० या कालावधीसाठी सरपंचांची आरक्षण सोडत दिनांक 23 एप्रिल 2025 रोजी दुपारी ठिक 2.00 वाजता काढण्यात येणार आहे. या सोडतीनंतर गावातील पुढचे कारभारी कोण-कोण असू शकतात? याचे चित्र स्पष्ट होणार आहे.
तालुक्यातील 49 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण सोडत दिनांक 23 एप्रिल 2025 रोजी दुपारी ठिक 2.00 वाजता कर्मवीर मा.सां.कन्नमवार सभागृहामध्ये आयोजित करण्यात आल्याची माहिती तहसीलदार मृदुला मोरे यांनी दिली.
कार्यवाहीचा अहवाल कार्यालयात सादर करावा.असे आदेश तहसिलदार मृदुला मोरे यांनी दिले आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार कर्मवीर मा.सां.कन्नमवार सभागृहामध्ये बुधवारी दुपारी 2.00 वाजता ही आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. 49 ग्रामपंचायतीचे आरक्षण सोडत पद्धतीने काढण्यात येईल. बुधवारी आयोजित या सरपंच पदाच्या आरक्षण सोडती करिता नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मूल तहसील कार्यालयाच्या वतीने करण्यात आलेले आहे.