28 एप्रिल 2025 रोजी जिल्ह्यात साजरा होणार सेवा हक्क दिन
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम आपली सेवा आमचे कर्तव्य
चंद्रपूर , दि 23 : जिल्ह्यांतील जिल्हास्तरावरील तसेच ग्राम पातळीवरील सर्व कार्यालयात येत्या 28 एप्रिल रोजी सेवा हक्क कायद्याची दशकपूर्ती व पहिला ‘सेवा हक्क दिन’ साजरा करण्यासाठी शासनाने निर्धारीत केलेले विविध उपक्रम प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी संबंधित विभाग प्रमुख यांना दिल्या आहेत.
पात्र व्यक्तींना पारदर्शक, कार्यक्षम व समयोचित लोकसेवा देण्याकरिता आणि व्यक्तींना पात्र लोकसेवा देणाऱ्या शासकीय विभागांमध्ये पादर्शकता व उत्तरदायित्व आणण्यासाठी राज्यात 28 एप्रिल 2015 पासून लोकसेवा हक्क कायद्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे. राज्य शासनाने या वर्षीपासूनच 28 एप्रिल हा दिवस ‘सेवा हक्क दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे आणि या कायद्याची दशकपूर्तीही होत आहे. या निमित्ताने चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, जिल्हा प्रशासन, महानगरपालिका, नगर परिषदा व नगर पंचायतांच्या कार्यक्षेत्रांमध्ये सेवा हक्क दिनानिमित्ताने विशेष सभेचे आयोजन करून या कायद्यात अंतर्भूत लोकसेवा हक्क कायद्याचे वैशिष्ट्ये विषद करणे आणि विविध विभागांकडून देण्यात येणाऱ्या सेवांच्या आढावा घेवून उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सत्कार करणे, जिल्ह्यात नागरिकांना घरपोच सेवा देण्यासाठी ‘सेवादूत’ योजना सुरू करणे, नागरिकांना एसएमएसद्वारे सेवा हक्क कायद्याबाबत व आपले सरकार पोर्टलची माहिती देणे, शाळा व महाविद्यालयांमध्ये या कायद्याच्या जागृतीसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करणे, लोककलांद्वारे या कायद्याचा प्रचार-प्रसार करण्याबाबत सूचित केले आहे.
सेवा हक्क दिनाच्या निमित्ताने ग्रामपंचायत स्तरावर आदर्श आपले सरकार केंद्राचे उद्घाटन करणे, विशेष ग्रामसभेचे आयोजन करून लोकसेवा हक्क कायद्याच्या ठळक तरतूदींचे वाचन करून ग्रामपंचायत सदस्यांना कायद्याच्या प्रती वितरीत करणे, प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये,पर्यटन व
जिल्हास्तरावर सेवा हक्क दिन नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय येथे सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात येत आहे.