मुल तालुका प्रशासनाच्या आदेशानुसार छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर ग्रामपंचायत कार्यालय चिचाळा येथे पार पडले. या कार्यक्रमाला तलाठी वडस्कर, रेशन कार्ड विभागाचे बनकर, रमेश सावकार येलांकिवार(रेशनदुकानदार) प्रगती सेतू केंद्राचेसंचालक प्रमोद मशाखेत्री, सिद्धांत महाऑनलाइन केंद्राचे संचालक प्रकाश चलाख, सुशांत खोब्रागडे (कोतवाल) सत्यवान बुरांडे, दीपक मेश्राम, मयूर आगडे, नामदेव गावतुरे,मारोती वैरागडे, वनिता वासेकर तसेच क्षेत्राअतंर्गत येत असलेल्या अधिनस्त ताडाला, चीचाला, हळदी येथील नागरिक उपस्थित होते.क्षेत्रिय स्तरावर ग्रामीण भागात सर्वसामान्य जनता, शेतकरी, विद्यार्थी, महिला यांचे महसूल विभागांशी संबधित दैनंदिन प्रकरणाचे निराकरण करणे व जनतेच्या तक्रारी निकालात काढणे, तसेच महसुल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम गतिमानवकरण्यासाठी मंडळ स्तरावर छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीरअभियान राबविण्यावाबत शासन निर्णयाद्वारे सुचना निर्गमित करण्यात आले आहेत. विविध प्रकारचे प्रमाणपत्र, दाखले, प्रदान करण्यासाठी ( रहिवासी दाखला, जातीचा दाखला,उत्पत्र दाखला, संजय गांधी निराधारयोजना,पीएम किसानयोजना,मतदान कार्ड, रेशन कार्ड) महसुल विभागाशी संबधित विविध प्रमाणपत्रे व दाखले निर्गमित करण्याकरीता मुल तालुक्यातील मुल मंडळ येथील चीचाळा गावात कार्यक्रम झाला. (ता. प्र. )