कायम खाते क्रमांक (पॅन) कार्ड भारतीय प्राप्तीकर विभागाद्वारे जारी
करण्यात आलेले 10 अंकाचे एक म्हत्वाचे कागदपत्र आहे. प्राप्तीकर रिटर्न
दाखल करण्यासाठी पॅन कार्ड असणे जरूरी आहे. तुमच्या पॅन कार्डवर सर्व
माहिती योग्य आणि अपडेट हवी. जर तुमच्या पॅनकार्डमध्ये एखादी चुकीची
माहिती आली असेल आणि ती दुरूस्त करायची असेल तर हे घरबसल्या ऑनलाइन करू
शकता.
अशाप्रकारे सुधारा पॅन कार्डमधील चूक
स्टेप 1. Tin-NSDL वेबसाइटवर जा.
स्टेप 2. होम पेज उघडल्यानंतर सर्व्हिस सेक्शनमध्ये पॅन पर्याय निवडा.
स्टेप 3. नव्या पेजवर डेटा पर्यायात परिवर्तन/सुधारणामध्ये अॅपलाय वर क्लिक करा.
स्टेप 4. सध्याच्या पॅन तारखेत बदल किंवा सुधारणा करण्यासाठी सिलेक्ट करा.
स्टेप 5. करेक्ट कॅटगरीमध्ये विविध पर्याय निवडा.
स्टेप 6. येथे नाव, जन्म तारीख आणि ई-मेल आयडी सहज बदलता येते. यानंतर
सबमिटवर क्लिक करा.
स्टेप 7. आता पॅन अॅपलिकेशन फॉर्मवर क्लिक करा.
स्टेप 8. जेव्हा ई-केवाईसी मागितली जाईल, तेव्हा तुम्हाला एक स्कॅन कॉपी
जमा करावी लागेल.
स्टेप 9. आता तुम्हाला नाव, पत्ता, वयाचा दाखला इत्यादी मागितलेली माहिती
नोंदवावी लागेल.
स्टेप 10. आता पेमेंटनंतर तुम्हाला सर्व आयडी प्रूफ कागदपत्रांसह
एनएसडीएल ई-गव्ह कार्यालयात जमा करावे लागतील.
स्टेप 11. यानंतर तुमच्या पॅन कार्डवर माहिती तुमच्या विनंतीनुसार दुरूस्त होईल.