राज्यातील शाळा सुरू करण्यासंदर्भात शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या…
मुंबई : महाराष्ट्रातील शैक्षणिक संस्थेतील नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. तथापि, शाळा सुरू करत असताना स्थानिक प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेऊनच शाळा सुरू (Schools reopnes) कराव्यात (local administration will take decision to start schools). कोरोनाचा प्रादुर्भाव असलेल्या जिल्ह्यातील शाळा सुरू करत असताना स्थानिक जिल्हाधिकारी, गट विकास अधिकारी आणि शिक्षण अधिकारी यांनी विचार विनिमय करुनच विद्यार्थ्यांचे आरोग्य व शैक्षणिक हित जपूनच निर्णय घ्यावा, अशा सूचना देण्यात आल्या असल्याचे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी सांगितले. या आदेशानुसार राज्यातील शाळा सुरू होण्याच्या दृष्टीने स्थानिक प्रशासनाचा निर्णय महत्वपूर्ण ठरणार आहे.
शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी या संदर्भात शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या आहेत. प्रत्यक्ष वर्ग सुरू झाले नाही तरी ऑनलाईन शिक्षण पद्धती सुरूच राहणार आहे. कोरोनाच्या महामारीच्या संकटात विद्यार्थी व शिक्षकांचे आरोग्य जपण्यासाठीच शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला असल्याचे शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी सांगितले.
मुंबईत २३ नोव्हेंबरला शाळा सुरू नाही
मुंबई महानगपालिकेने मुंबईतील शाळा पुढील महिन्यात सुरू कऱण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर शाळांनीही तयारी सुरू केली आहे. इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग लवकरच सुरू केले जाणार आहेत. दिवाळीनंतर कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचं दिसून येत आहे, त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने या महिन्यात शाळा सुरू न करता पुढील महिन्यात सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्यातील कोरोनाची स्थिती
महाराष्ट्रात गुरुवारी (१९ नोव्हेंबर २०२०) ५,८६० रुग्ण कोरोनामुक्त झाले यामुळे राज्यात आजपर्यंत एकूण १६,३५,९७१ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९२.७९ % एवढे झाले आहे. १९ नोव्हेंबर २०२० रोजी राज्यात ५,५३५ नवीन रुग्णांचे निदान झाले तर १५४ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद .सध्या राज्यातील मृत्यूदर २.६३ % एवढा आहे. आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ९९,६५,११९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १७,६३,०५५ (१७.६९ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५,६०,८६८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ४,२८४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण ७९,७३८ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.